बाहेर काम करताना प्रदूषण करणाऱ्या घटकांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना -
• बाहेर जाण्यापूर्वी अँप्स किंवा वेबसाइटद्वारे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) तपासा. प्रदूषणाची पातळी जास्त असल्यास, अनावश्यक बाहेरील कामे टाळा.
• प्रदूषित भागात, विशेषतः जास्त वाहतूकीच्या वेळी, धावणे (जॉगिंग) किंवा थकवा देणार्या अनावश्यक शारीरिक हालचाली टाळा.
• हवेची गुणवत्ता (AQI) खराब असल्यास, जास्त प्रदूषण असणार्या दिवसांमध्ये बाहेर जाण्याच्या वेळी फेस मास्क वापरा.
• वाहनांच्या चलनवलनातून होणाऱ्या अवाजवी उत्सर्जनामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक आणि सामायिक वाहतूक (एकाच वाहनातून अनेकांनी प्रवास करणे - कारपूल) यांचा वापर करा.
प्रदूषणकारी घटकांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी संरक्षणात्मक उपाय:
• बाहेर जाताना, विशेषतः अत्यंत प्रदूषित भागात, N95 किंवा N99 मास्क वापरा.
• घरात प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी एअर प्युरिफायरचा वापर करा.
• घरामध्ये धूम्रपान टाळा, एक्झॉस्ट फॅन वापरा आणि हवा खेळती राहील अशा प्रकारे घराची रचना ठेवा जेणेकरून घरातील हवा जास्तीत जास्त स्वच्छ राहील.
• प्राणायाम, योगासने इत्यादी श्वसनास उपयोगी असणार्या क्रियांद्वारे श्वासोच्छ्वास आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवा, यामुळे प्रदूषकांविरुद्ध प्रतिकारशक्ती देखील वाढते.
• पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात करा. ह्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ/प्रदूषक बाहेर टाकण्यास मदत होते.
• प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी क- जीवनसत्व (संत्री, लिंबू), ओमेगा-३ फॅटी असिड (सुकामेवा, मासे) आणि इ - जीवनसत्व (पालक, बदाम) तसेच अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थांचे सेवन करा.
घरामधील प्रदूषण कमी करणे:
• घरामध्ये कचरा, प्लास्टिक जाळणे तसेच कृत्रिम एअर फ्रेशनर, क्लीनिंग स्प्रे यांचा वापर इत्यादी गोष्टी टाळा, कारण ते हानिकारक रसायने आणि सूक्ष्मकण सोडतात.
• घरातील फरशी नियमितपणे स्वच्छ करा, हाताने स्वच्छ करणे शक्य नसलेल्या ठिकाणी व्हॅक्यूम क्लीनर वापरा आणि घर धुळीपासून मुक्त ठेवण्यासाठी पडदे आणि गालिचे वारंवार धुवा.
• अधिक झाडे लावल्याने हिरवळीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हानिकारक घटक शोषले जातात आणि हवेची गुणवत्ता सुधारते.
• धूम्रपान टाळा आणि धूम्रपान-मुक्त क्षेत्रांना प्रोत्साहन द्या, कारण तंबाखूचा धूर घरातील आणि बाहेरील वायू प्रदूषण वाढवतो.
वायू प्रदूषण रोखण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत. वायू प्रदूषण कमी करण्याचे किंवा रोखण्याचे काही प्रभावी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:
वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन कमी करा:
• दररोजच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक/कारपूलचा वापर करा, त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल.
• ऊर्जा व इंधन कार्यक्षम वाहने जसे की विद्युत उर्जेवर चालणारी वाहने, (EVs) आणि हायब्रिड वाहने इ. वापरल्याने वाहनामार्फत होणारे विषारी वायूंचे उत्सर्जन कमी होते.
• सिग्नलवर थांबलेले असताना किंवा वाहन पार्क करताना इंजिन बंद करा, यामुळे इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी होते.
• जवळच्या अंतराच्या प्रवासासाठी शक्य असल्यास वाहनाऐवजी चालत जाण्याचा पर्याय निवडा.
ऊर्जेची गरज कमी करा / घर आणि कामाच्या ठिकाणी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करा:
• जीवाश्म इंधनावर अवलंबून रहाणे कमी करण्यासाठी घरामध्ये पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करा, जसे की सौरउर्जा उपकरणे वापरणे इत्यादी.
• घर आणि कार्यालयामध्ये विजेचे उपकरणे वापर नसताना बंद ठेवा, त्यामुळे वीजेची बचत होते आणि वीज निर्मितीमुळे होणारे प्रदूषण कमी होते.
• ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे, जसे की LED बल्ब, यांचा वापर करा कारण ते कमी वीज वापरतात आणि त्यामुळे विजेच्या मागणीमध्ये घट होते.
औद्योगिक आणि घरगुती प्रदूषण कमी करा:
• पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रिया वापरणाऱ्या कंपन्यांची उत्पादने निवडा.
• रासायनिक आणि कृत्रिम उत्पादने टाळा आणि त्याऐवजी नैसर्गिक स्वच्छता उत्पादने, जसे की स्वच्छता करणारी द्रव्य, डासांना प्रतिबंध करणारी साधने (Mosquito Repellents), एअर फ्रेशनर्स इत्यादींचा वापर करा.
• घरामध्ये पाने, कचरा किंवा प्लास्टिक जाळण्याचे टाळा, कारण त्यामुळे हानिकारक विषारी
घटक उत्सर्जित होतात.
घरातील हवेची गुणवत्ता सुधारा
• घरामध्ये एअर प्युरिफायरचा वापर करा, कारण ते हानिकारक घटक (प्रदूषक) गाळून हवा शुद्ध करतात.
• शक्य असल्यास हवा चांगली खेळती राहू द्या, जेणेकरून ताजी हवा घरामध्ये येऊ शकेल.
शेती आणि जंगलतोडीमुळे होणारे प्रदूषण कमी करा
• अधिक झाडे लावा. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, प्राणवायू (ऑक्सिजन) उत्सर्जित करतात आणि हवा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
• सेंद्रिय शेती, पीकांमध्ये फेरपालट करणे आणि नैसर्गिक खतांचा वापर यांसारख्या पारंपारिक शेती पद्धतींचे पालन केल्याने हानिकारक रासायनिक उत्सर्जन कमी होऊ शकते.
• शेतकऱ्यांना पिके काढल्यानंतर तण व गवत उघड्यावर जाळण्याऐवजी बायो-डिकंपोझरसारख्या पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करा.
• कोळसा आणि तेल यांसारख्या जीवाश्म इंधनांच्या ऐवजी पर्यायी किंवा अक्षय (Renewable) उर्जा स्रोतांचा वापर करा, जसे की सौरऊर्जा उपकरणे, विद्युत उर्जेवर चालणारी वाहने, जलविद्युत ऊर्जा इत्यादी.
• प्लास्टिकचा वापर कमी करा कारण त्याच्या निर्मितीदरम्यान विषारी प्रदूषक उत्सर्जित होतात. प्लास्टिक चे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, त्यामुळे शक्य असेल तिथे प्लास्टिकऐवजी पर्यायी जैव-विघटनशील पदार्थ वापरा.
1. https://en.wikipedia.org/wiki/Air_pollution
2. https://www.nrdc.org/stories/air-pollution-everything-you-need-know
3. https://www.who.int/health-topics/air-pollution#tab=tab_1
4. https://pib.gov.in/newsite/printrelease.aspx?relid=110654
5. https://safar.tropmet.res.in/AQI-47-12-Details
6. https://www.airnow.gov/aqi/aqi-basics/
7. https://www.aqi.in/blog/en-in/10-main-causes-of-air-pollution/
8.https://www.nrdc.org/bio/vijay-limaye/indias-air-pollution-challenge-spans-rural-and-urban-areas#:~:text=Air Pollution Knows No Boundaries&text=Last year's annual PM2.5,of 5 µg/m3:
9.https://www.indiascienceandtechnology.gov.in/listingpage/air-pollution-india-status-and-challenges#:~:text=In a study that appeared,is attributable to air pollution.