मागील लेखात (भाग-१), आपण कृत्रिम लाल खाद्य रंगांच्या विविध प्रकारांबद्दल, त्यांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल आणि रासायनिक रचनेबद्दल, अन्न आणि पेये, सौंदर्यप्रसाधने आणि औषध उद्योगांमध्ये त्यांच्या वापरांबद्दल आणि त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांबद्दल सविस्तर चर्चा केली. या लेखात, आपण पिवळ्या खाद्य रंगांबद्दलची चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. चला तर मग त्याचा सविस्तर आढावा घेऊया :
1. यलो क्रमांक–५ (टार्टराझिन): (E-102)
टार्ट्राझीन हा एक कृत्रिम खाद्य रंग असून तो केवळ विविध अन्नपदार्थांनाच नव्हे तर सौंदर्यप्रसाधनांना व औषधनिर्मितीतील उत्पादनांनाही उठावदार पिवळा रंग देण्यासाठी वापरला जातो. टार्टराझिन (यलो क्र. ५) इतर अनेक कृत्रिम रंगांसोबत वापरून हिरव्या छटा निर्माण करण्यासाठी उपयोगात आणला जातो. रासायनिक दृष्ट्या हा पेट्रोलियम-आधारित पदार्थांपासून तयार होणारे अझो संयुग आहे. ही एक चमकदार केशरी-पिवळी पावडर असून ती पाण्यात आणि ग्लिसरॉलमध्ये विरघळते. याला E-१०२ या क्रमांकाने ओळखले जाते.
याचा वापर कुठे होतो?
हा रंग खाद्य उद्योगात तसेच औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधने उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. आता त्याचे उपयोग सविस्तर पाहूया:
A. खाद्य उद्योग:
B. सौंदर्यप्रसाधने:
C. औषधनिर्मिती
ओळख सुलभ होण्यासाठी टार्टराझिनचा वापर विविध औषधांमध्ये पिवळा, नारंगी किंवा हिरवा रंग देण्यासाठी केला जातो. त्याचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत:
संबंधित आरोग्यासाठी धोके:
काही शास्त्रीय संशोधनानुसार, खाद्य रंगांच्या स्वरूपात टार्ट्राझीनच्या सेवनामुळे आपल्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. जरी बहुतांश टार्ट्राझीन अन्नपदार्थांमधून आपल्या शरीरात प्रवेश करत असले, तरी सौंदर्यप्रसाधने आणि औषधांमधील त्याचा वापर संवेदनशील व्यक्तींमध्ये आरोग्यविषयक दुष्परिणामांचे कारण बनू शकतो, कारण ते त्वचेद्वारे शोषले जाऊ शकते किंवा सेवन केलेल्या औषधांद्वारे शरीरात चयापचय केले जाऊ शकते. काही संशोधनानुसार, फक्त १ मिग्रॅ टार्ट्राझीन/यलो-५ चे सेवन देखील संवेदनशील व्यक्तींमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण करू शकते. आता या आरोग्यधोक्यांचा सविस्तर आढावा घेऊया:
A. ॲलर्जीक प्रतिक्रिया:
टार्ट्राझीन खाद्य रंगाच्या सेवनामुळे होणाऱ्या ॲलर्जीक प्रतिक्रिया सौम्य स्वरूपातील खाज, अंगावर उठणारे पित्त, एक्झिमा आणि त्वचेवर पुरळ उठण्यापासून ते दम्यासारख्या लक्षणांपर्यंत असू शकतात, किंवा गंभीर अवस्थेत ॲनाफिलेक्सिस सारखी तीव्र प्रतिकूल प्रतिक्रिया देखील उद्भवू शकते. या प्रतिक्रिया कोणत्या प्रमाणात व किती तीव्रतेच्या होतील हे व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर तसेच घेतलेल्या रंगाच्या प्रमाणावर अवलंबून असते. हिस्टामाइन आणि इतर दाह निर्माण करणाऱ्या रसायनांच्या उत्सर्जनामुळे ही दाहक आणि ॲलर्जीक प्रतिक्रिया सुरू होते.
B. ॲस्पिरिन असहिष्णुता:
काही व्यक्तींमध्ये ॲस्पिरिनविषयी संवेदनशीलता आढळते. अशा वेळी, जर त्यांनी ॲस्पिरिन घेतले, तर घरघर लागणे, नाक वाहणे, त्वचेवर पुरळ उठणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. या स्थितीला ॲस्पिरिन असहिष्णुता (Aspirin Intolerance) असे म्हणतात. रासायनिक दृष्ट्या टार्ट्राझीनची संरचना ॲस्पिरिनशी साधर्म्य असलेली आहे आणि ते शरीरात ॲस्पिरिनप्रमाणेच काही प्रमाणात कार्य करते. त्यामुळे, ज्यांना ॲस्पिरिनची असहिष्णुता आहे अशा व्यक्तींमध्ये, टार्ट्राझीनचे सेवन केल्यावरही कधी कधी याच प्रकारच्या प्रतिकूल प्रतिक्रिया उद्भवू शकतात.
C. दमा आणि ऱ्हायनायटिसच्या (नासिकाशोथाची) तीव्रतेत वाढ:
ज्या व्यक्तींना दमा किंवा नासिकाशोथासारखे श्वसनविकार आहेत, अशा व्यक्तींमध्ये टार्ट्राझिनयुक्त खाद्य रंगाचे सेवन केल्यास त्यांच्या विद्यमान आजाराची तीव्रता वाढू शकते.
D. अतिसक्रियता आणि वर्तनातील बदल:
टार्ट्राझीनच्या सेवनाचा संबंध मुलांमध्ये ए.डी.एच.ड (ADHD अटेन्शन डेफिसिट/हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर) सदृश लक्षणांच्या विकासाशी जोडला जातो. यामध्ये लक्ष केंद्रीत न होणे, विसराळूपणा, अतिसक्रियता, अस्वस्थता आणि आत्म-नियंत्रणाचा अभाव, यांच्या विकासाशी जोडलेला आहे.
ही स्थिती अनेक यंत्रणांमुळे विकसित होऊ शकते, जसे की मनःस्थिती, लक्ष, एकाग्रता आणि वर्तनासाठी आवश्यक असलेल्या न्यूरोट्रान्समीटर क्रियाशीलतेतील असंतुलन, हिस्टामिन स्रवणामुळे होणारा परिणाम, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि मुक्त रॅडिकल्समुळे होणारे मेंदूतील पेशींवरील नुकसान, शरीरातील झिंकची कमतरता (ज्यामुळे प्रभावित मुलांमध्ये वर्तन व भावनिक स्थिती खालावू शकते).
E. महत्त्वाच्या अवयवांमध्ये रोगजन्य (पॅथोलॉजिकल) जखमा:
काही शास्त्रीय अभ्यासानुसार, टार्ट्राझीनच्या दीर्घकालीन सेवनामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण (oxidative stress) आणि मुक्त रॅडिकल्स (free radicals) वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे या महत्त्वाच्या शरीरातील पेशी आणि ऊतकांमध्ये दाहजन्य इजा होते आणि विविध रोगजन्य (पॅथोलॉजिकल) जखमांचा विकास होतो:
F. कर्करोगाचा (Malignancy) वाढलेला धोका:
टार्ट्राझिनचे दीर्घकालीन सेवन केल्यास शरीरात कर्करोग (Cancer) होण्याचा धोका वाढू शकतो. यामागे अनेक यंत्रणा कारणीभूत ठरू शकतात, जसे की:
यलो-५ / टार्ट्राझिन हा खाद्य रंग जठरांत्र संस्थेत , पचनमार्गात (Gastrointestinal tract) विघटित होऊन चयापचयित (metabolised) होतो. त्यामुळे बृहदांत्राचा (Colon) कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
G. अत्यधिक थकवा:
टार्ट्राझिनच्या सेवनामुळे काही व्यक्तींमध्ये थकवा जास्त प्रमाणात जाणवतो. यामागे अनेक जैविक कारणे असू शकतात, त्यापैकी प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत –
H. निद्रानाश:
टार्ट्राझीनच्या सेवनाचा संबंध झोपेच्या विकारांशी आहे आणि गंभीर प्रकरणांमध्ये निद्रानाश होऊ शकतो. या प्रतिकूल परिणामांमध्ये अनेक यंत्रणा कार्यरत असतात, जसे की:
I. ॲनिमिया
काही वैज्ञानिक अभ्यासानुसार, टार्ट्राझीनची हिमोग्लोबिनसोबतची (haemoglobin) आंतरक्रिया (interaction) टार्ट्राझीन-प्रेरित ॲनिमियामागील प्राथमिक कारण असू शकते. हे कसे घडते ते पाहूया:
सेवनासाठी सुरक्षित मर्यादा काय आहे?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टार्ट्राझीनचा उपयोग खाद्य रंग म्हणून मर्यादित प्रमाणात (साधारणपणे २०० पीपीएम किंवा २०० मिग्रॅ/किलोपर्यंत) केला जातो, जेव्हा तो एकटा किंवा इतर रंगांच्या संयोजनात वापरला जातो. टार्ट्राझीनसाठी स्वीकार्य दैनंदिन सेवन (Acceptable Daily Intake - ADI) ७.५ मिग्रॅ/किलो शरीर वजन/प्रति दिवस पर्यंत आहे.
वैज्ञानिक अभ्यासांनुसार, ०.१ मिलीग्राम इतक्या कमी प्रमाणात टार्ट्राझिन देखील संवेदनशील व्यक्तींमध्ये प्रतिकूल परिणाम करू शकते.
2. यलो क्र. ६ (सनसेट यलो): (E-110)
हा एक कृत्रिम खाद्य रंग आहे जो नारंगी-पिवळी छटा देण्यासाठी वापरला जातो. खाद्य उद्योगाव्यतिरिक्त, तो सौंदर्यप्रसाधने आणि औषध उद्योगांमध्ये देखील वापरला जातो. रासायनिकदृष्ट्या, हा ॲरोमॅटिक अमाइन्सपासून मिळवलेला एक कृत्रिम अझो डाय (dye) आहे. भौतिक स्वरूपात, ही तपकिरी-नारंगी पावडर किंवा दाणेदार (ग्रॅन्युल्स) रूपात आढळतो. याला E-११० या क्रमांकाने ओळखले जाते.
याचा वापर कुठे होतो?
सनसेट यलो किंवा यलो नं. ६ हा एक कृत्रिम खाद्य रंग असून, विविध अन्नपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आणि औषधी उत्पादनांमध्ये नारंगी-पिवळी छटा देण्यासाठी वापरला जातो.
A. खाद्य उद्योग:
B. सौंदर्यप्रसाधने:
C. औषधनिर्मिती:
जरी भारतात अमरंथ/E-१२३ (Amaranth/E-123) रंग खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यास प्रतिबंधित आहे, तरीही चॉकलेट्स आणि कॅरामेलसारख्या उत्पादनांमध्ये तपकिरी रंग तयार करण्यासाठी कधीकधी यलो क्र. ६ अमरंथ किंवा E-१२३ रंगासोबत वापरला जातो.
संबंधित आरोग्यासाठी धोके:
A. ॲलर्जीक प्रतिक्रिया:
सनसेट यलो/यलो-६ खाद्य रंगामुळे होणाऱ्या ॲलर्जीक प्रतिक्रिया सौम्य (अंगावर उठणारे पित्त, खाज आणि त्वचेवर पुरळ) ते गंभीर (घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास) अशा वेगवेगळ्या प्रकारच असू शकतात. काही व्यक्तींमध्ये, यामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते, उदा. ॲनाफिलेक्सिस/ॲनाफिलेक्टिक शॉक. यलो-६ विशिष्ट प्रकारच्या ॲन्टिबॉडीला (IgE) जोडले जाते, तेव्हा विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींना (बेसोफिल्स) उत्तेजित करते, ज्यामुळे ही स्थिती उद्भवते, जे ॲलर्जीक आणि दाहक प्रतिक्रियांशी संबंधित आहे (उदा. हिस्टामाइनचे उत्सर्जन आणि ॲलर्जीक प्रतिक्रिया सुरू होणे).
B. मुलांमध्ये अतिसक्रियता (ADHD सारखे वर्तन):
काही वैज्ञानिक अभ्यासानुसार, सनसेट यलो खाद्य रंगाच्या सेवनामुळे मुलांमध्ये ADHD सारख्या वर्तनाची लक्षणे (एकाग्रतेचा अभाव, विसरभोळेपणा, जास्त क्रियाशीलता, जास्त बोलणे, अस्वस्थता, विचार न करता कृती करणे, आत्म-नियंत्रणाचा अभाव, इत्यादी) वाढू शकतात. यामागील यंत्रणा खालीलप्रमाणे असू शकते:
C. जठरांत्रीय समस्या:
यलो-६/सनसेट यलो खाद्य रंगाच्या दीर्घकाळ सेवनाचा संबंध जठरांत्रीय मार्गात सूज येणे, दाह निर्माण होण (inflammation) आणि आंत्रदाहजन्य आजारांचा (इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीजचा) धोका वाढणे याच्याशी संबंधित आहे. यामागील यंत्रणांमध्ये खालील बाबींचा समावेश असू शकतो:
D. रक्तविज्ञानाशी (हेमॅटोलॉजिकल) संबंधित बदल:
काही शास्त्रीय अभ्यासानुसार, सनसेट यलो खाद्य रंगाच्या सेवनामुळे, विशेषतः इतर ॲडिटीव्हजच्या (additives) संयोजनात, लाल रक्तपेशींची संख्या, पांढऱ्या रक्तपेशींची संख्या आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. यामागे अनेक यंत्रणा असू शकतात, जसे की:
E. निद्रानाश:
अत्यधिक प्रमाणात यलो-६ (सनसेट यलो FCF) चे सेवन केल्यास काही व्यक्तींमध्ये निद्रानाश (इन्सॉम्निया) किंवा झोपेच्या चक्रात बिघाड होऊ शकतो, कारण ते रक्त–मेंदू संरक्षक अडथळा (blood-brain barrier) पार करू शकते. या प्रतिकूल परिणामांसाठी जबाबदार असलेल्या यंत्रणा खालीलप्रमाणे असू शकतात:
F. महत्त्वाच्या अवयवांवर विषारी परिणाम:
काही शास्त्रीय अभ्यासानुसार, यलो-६ (सनसेट यलो FCF) या रंगद्रव्याचे अत्याधिक किंवा दीर्घकालीन सेवनामुळे यकृत आणि मूत्रपिंड यांसारख्या अवयवांवर संभाव्य विषारी परिणाम होऊ शकतात. संवेदनशील व्यक्तींमध्ये मेंदूवर देखील परिणाम होऊ शकतो. तथापि, हे परिणाम सामान्यतः सेवन सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त झाल्यावरच दिसून येतात. यामागील कारण ऑक्सिडेटिव्ह ताण आणि मुक्त रॅडिकल्स-प्रेरित सूज किंवा दाह असू शकते, ज्यामुळे या महत्त्वाच्या अवयवांमधील ऊतींना नुकसान होऊ शकते. खालील विषारी परिणाम दिसून येतात :
सेवनासाठी सुरक्षित मर्यादा काय आहे?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यलो-६/सनसेट यलोचा उपयोग खाद्य रंग म्हणून मर्यादित प्रमाणात (साधारणपणे १०० पीपीएम किंवा १०० मिग्रॅ/किलोपर्यंत) केला जातो, जेव्हा तो एकटा किंवा इतर रंगांच्या संयोजनात वापरला जातो. टार्ट्राझीनसाठी स्वीकार्य दैनंदिन सेवन (ADI) २.५ मिग्रॅ/किलो शरीर वजन/प्रति दिवस पर्यंत आहे.
3. क्विनोलीन यलो
क्विनोलिन यलो हा खाद्य रंग आहे जो डिसेंबर २०२० पासून FSSAI (भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण) यांनी भारतात अन्न उत्पादनांमध्ये वापरण्यास बंदी घातला आहे; तथापि, भारतात औषधनिर्माण आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरण्यासाठी त्याला अजूनही परवानगी आहे. आपण टॅब्लेट, कॅप्सूल किंवा सिरपच्या स्वरूपात घेतलेली कोणतीही औषधे आपल्या पचनमार्गात आणि तेथून रक्तप्रवाहात प्रवेश करतात. त्वचेवर लावलेली सौंदर्यप्रसाधने थेट त्वचेतूनच रक्तप्रवाहात शोषली जातात. त्यामुळे, क्विनोलीन यलो खाद्य रंग थेट अन्नपदार्थांमधून सेवन केला जात नसला, तरीही तो आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणून, या खाद्य रंगाला आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.
याचा वापर कुठे होतो?
हा खाद्य रंग प्रामुख्याने औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधने यामध्ये वापरला जातो, जसे की:
A. औषधनिर्मिती:
B. सौंदर्यप्रसाधने:
संबंधित आरोग्यासाठी धोके:
आपल्याला माहीत आहेच की, क्विनोलीन यलो आपण घेत असलेल्या औषधांद्वारे आपल्या शरीरात सहज प्रवेश करू शकतो किंवा आपण वापरत असलेल्या सौंदर्यप्रसाधनांमधून त्वचेद्वारे शोषला जाऊ शकतो. त्यामुळे या रंगाशी संबंधित आरोग्यावरील दुष्परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे. आता आपण त्यापैकी प्रत्येकाचा एकामागून एक अभ्यास करूया.
A. ॲलर्जीक प्रतिक्रिया:
काही संवेदनशील व्यक्तींना क्विनोलीन यलोमुळे ॲलर्जीक प्रतिक्रिया जाणवू शकतात, ज्यामध्ये अंगावर उठणारे पित्त, त्वचेवर पुरळ, नाक बंद होणे ते दम्यासारखी लक्षणे किंवा गंभीर प्रकरणांमध्ये ॲंजिओएडेमा (Angioedema) पर्यंतचे परिणाम असू शकतात. क्विनोलीन यलो किंवा त्याचे विषारी चयापचयजन्य पदार्थ ॲलर्जेन म्हणून काम करतात, ज्यामुळे हिस्टामाइन आणि इतर दाहक रसायनांचे उत्सर्जन होते आणि ॲलर्जीक प्रतिक्रिया उद्भवतात.
B. वर्तणुकीत बदल (विशेषतः मुलांमध्ये):
काही वैज्ञानिक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की क्विनोलीन यलो; जर इतर रंगद्रव्ये आणि संरक्षक पदार्थांसोबत वापरला गेला तर त्याच्या मिश्रणामुळे, विशेषतः मुलांमध्ये ADHD सारख्या वर्तणुकीतील बदल दिसून येऊ शकतात. यामागील यंत्रणा खालीलप्रमाणे असू शकतात:
C. प्रथिनांच्या गुठळ्या होणे आणि न्यूरोडीजेनेरेटिव्ह रोगांचा वाढलेला धोका:
वैज्ञानिक संशोधनानुसार, क्विनोलिन यलो (Quinoline Yellow) शरीरात गेल्यानंतर, मेंदूतील काही प्रथिनांशी संपर्क साधून त्यांचे असामान्य गुठळ्या (aggregation) निर्माण करू शकते. अशा असामान्य प्रथिन गुठळ्यांमुळे अल्झायमर (Alzheimer’s Disease) आणि पार्किन्सन्स (Parkinson’s Disease) सारख्या न्यूरोडिजनरेटिव्ह आजारांचा धोका वाढू शकतो.
D. अंतःस्रावी प्रणालीतील व्यत्यय (एंडोक्राइनमध्ये बिघाड):
वैज्ञानिक संशोधनानुसार, क्विनोलीन यलो हे शरीरातील हार्मोन्सच्या क्रियेतील व्यत्यय आणू शकते व ज्यामुळे अंतःस्रावी (एंडोक्राइन) प्रणालीत संभाव्य बिघाड होऊ शकतो. उदाहरणार्थ, काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की ते इस्ट्रोजेन रिसेप्टर्समध्ये हस्तक्षेप करू शकते, ज्यामुळे इस्ट्रोजेनच्या नैसर्गिक कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.
E. डीएनएला (DNA) नुकसान होण्याचा धोका:
काही संशोधनानुसार, क्विनोलीन यलो खाद्य रंगात आपल्या डीएनएला नुकसान पोहोचवण्याची क्षमता आहे. हे डीएनएचे नुकसान पुढे जनुकीय बदल (Mutations) व कर्करोगजन्य स्थिती (Malignancy) निर्माण होण्याचा धोका वाढवू शकते.
F. महत्त्वाच्या अवयवांना नुकसान (यकृत आणि मूत्रपिंड):
क्विनोलीन यलो त्वचेद्वारे शोषला जाऊ शकतो किंवा आपण सेवन केलेल्या औषधांद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो. जर अशा प्रकारचा संपर्क दीर्घकाळ राहिला, तर यकृत आणि मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान होऊ शकते. हे कसे घडते ते पाहूया:
G. प्रजनन व विकासात्मक आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम:
काही संशोधनानुसार, क्विनोलीन यलो डीएनएला नुकसान पोहोचवू शकते आणि डीएनए दुरुस्तीमध्ये गुंतलेल्या यंत्रणांमध्ये बिघाड करू शकते. त्यामुळे, प्रजनन आणि विकासात्मक आरोग्यावर जनुकीय विषारी (genotoxic) परिणाम होऊ शकतात.
H. त्वचेवर होणारे नकारात्मक परिणाम:
सौंदर्यप्रसाधनांमधून त्वचेद्वारे क्विनोलीन यलो रंगाचे शोषण झाल्यामुळे आपल्या त्वचेवर स्थानिक पातळीवर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात, यात खाज सुटणे, लालसरपणा, डर्माटायटिस (त्वचेची सूज), आणि फोटोसेंसिटिव्हिटी (सूर्यप्रकाशामुळे होणारी त्वचेची प्रतिकूल प्रतिक्रिया) यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो.
आत्तापर्यंतच्या या मालिकेत आपण पहिल्या दोन भागांमध्ये, आपण लाल आणि पिवळ्या कृत्रिम खाद्य रंगांवर सविस्तर चर्चा केली आहे. या लेखाच्या पुढील किंवा अंतिम (भाग-३) भागामध्ये आपण इतर कमी वापरले जाणारे खाद्य रंग (हिरवा आणि निळा रंग ) यांविषयी अधिक जाणून घेऊयात .
अस्वीकरण: हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे आणि त्यात कृत्रिम खाद्य रंगांचा आणि अन्न, सौंदर्यप्रसाधने आणि औषधांमध्ये त्यांच्या उपस्थितीचा आढावा देण्यात आला आहे. हा वैद्यकीय किंवा व्यावसायिक सल्ला मानला जाऊ नये. आपल्या आरोग्याबाबत, उपचारांबद्दल किंवा औषधांबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेहमीच आपल्या डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्यसेवा प्रदात्याचा सल्ला घ्यावा. वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय कोणताही निर्धारित उपचार थांबवू नये, बदलू नये किंवा वगळू नये.
REFERENCES