Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

  फ्रेंच फ्राईज हा एक अतिशय चविष्ट आणि प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. सामान्यपणे जे फ्रेंच फ्राईज आपण खातो ते तेलामध्ये भरपूर तळलेले आणि चरबीयुक्त असतात, तसेच ते फक्त बटाट्यापासूनच बनवले जातात त्यामुळे फारसे पौष्टिक हि नसतात. पण आपण हे जे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत ते वेगवेगळ्या भाज्यांचे उदा: लाल भोपळा, दुधी भोपळा, बटाटा, ई. असणार आहेत व त्यामुळे नक्कीच जास्त पौष्टिक असणार. हे फ्रेंच फ्राईज तळलेले नाहीत तर भाजलेले असतात आणि तेसुद्धा १ थेंब पेक्षाही कमी तेल वापरून, त्यामुळे त्यात कॅलरीज हि अतिशय कमी प्रमाणात असतात. चला तर मग ह्या कमी कॅलरीयुक्त फ्रेंच फ्राईज चा आस्वाद आपल्या आवडत्या मेयॉनीज सारखा सॉस किंवा खट्टा-मीठा सॉस बरोबर घेऊयात.  

मिक्स भाज्यांचे मुटके

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. बटाटे - ३ (मध्यम आकाराचे) २. लाल भोपळा - २५० ग्रॅम ३. दुधी भोपळा - २५० ग्रॅम

मसाले : १. मीठ - चवीप्रमाणे २. संडे मसाला - १/२ टी स्पून ३. तीळ - पर्यायी ४. मिक्स हर्ब्स - पर्यायी ५. चाट मसाला - १/२ टी स्पून ६. तेल - ब्रशिंग साठी (१ टी स्पून)

 

पध्दत :
  • प्रथम साहित्यामध्ये दिलेल्या तीनही भाज्या (बटाटे, लाल भोपळा, दुधी भोपळा) स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्याव्यात.
  • त्यानंतर बटाटे, दुधी भोपळा आणि लाला भोपळ्याची साले काढून घ्यावीत.
  • आता सर्व भाज्या चिरून त्यांचे बारीक आणि लांब तुकडे करावेत (फ्रेंच फ्राईज प्रमाणे).
  • लांब आणि बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतल्यावर सर्व भाज्या मीठ आणि हळद मिक्स केलेल्या कोमट पाण्यामध्ये २० मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात, जेणेकरून त्यावरील कीटकनाशके निघून जाण्यास मदत होते.
  • वीस मिनिटे झाल्यावर कोमट पाणी गाळून काढून टाकावे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने पुन्हा नीट धुवून घ्याव्यात.
  • आता उपलब्धतेनुसार हॉटप्लेट/गॅस बर्नर/स्टोव्ह वर एक कढई ठेऊन त्यामध्ये ह्या सर्व चिरलेल्या (कापलेल्या) भाज्या १०-१२ मिनिटांसाठी नीट वाफवून घ्याव्यात.
  • आता एक तवा हॉटप्लेट/गॅस बर्नर/स्टोव्ह वर गरम करत ठेवावा आणि त्याला ब्रश च्या साहाय्याने १ थेंब तेल नीट लावून घ्यावे.
  • तवा नीट गरम झाल्यावर त्यावर थोडे चिरलेल्या भाज्यांचे (बटाटा, लाल भोपळा आणि दुधी भोपळा) लांब-बारीक तुकडे ठेवावेत आणि नीट सर्व बाजूने खरपूस भाजून घ्यावेत.
किंवा

          एअर-फ्रायर अथवा ग्रील ओव्हन मध्ये १० मिनिटांसाठी खरपूस भाजून घ्यावेत

  • नंतर ह्यावर साहित्यामध्ये दिलेले सर्व मसाले चवीप्रमाणे घालावेत जसे: चाट मसाला, संडे मसाला, मीठ, तीळ, मिक्स हर्ब्स ई.
  • आता ह्या गरमागरम फ्रेंच फ्राईज चा आस्वाद टोमॅटो सॉस/खट्टा-मीठा सॉस/मेयॉनीज सारखा सॉस सोबत लुटावा.

 

 

Recipe in English