Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

हा आहे थालीपीठाचा (महाराष्ट्रीयन जेवणामधील एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ) आणखी एक प्रकार. बाजरीचे पीठ आणि भाज्या मिसळून तयार करण्यात येणारे हे एक पौष्टिक थालीपीठ आहे. हे बनवण्यासाठी फक्त १-२ थेंब तेलाचीच आवश्यकता आहे, ते सुद्धा फक्त तव्याला ब्रशिंग करण्यासाठी ज्यामुळे ह्या थालीपीठात खूपच कमी कॅलरीज आहेत. हे रुचकर थालीपीठ ज्यांना वजन कमी करायचे आहे पण चवीवर तडजोड करायची नाही अश्यांसाठी नाश्त्यास उत्तम पर्याय ठरू शकते.

 मिक्स व्हेजी - बाजरी थालीपीठ

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. गाजर- १ २. कोबी- १०० ग्रॅम ३. दुधी भोपळा - १०० ग्रॅम ४. मेथी - १५० ग्रॅम ५. कांदे - २ मध्यम आकाराचे ६. कोथिंबीर - ५० ग्रॅम ७. बाजरीचे पीठ - २५० ग्रॅम ८. मीठ - चवीप्रमाणे ९. हळद (पूड) - १/२ टी स्पून १०. संडे मसाला - १ टी स्पून ११. मिरची पूड - १/२ टी स्पून १२. तीळ - १ टी स्पून १३. धने-जिरे पूड - १ टी स्पून १४. तेल - फक्त ब्रशिंग साठी

 

पध्दत :

१. प्रथम साहित्यामध्ये दिलेल्या सर्व भाज्या (गाजर, दुधी भोपळा, कोबी, मेथी, कोथिंबीर, ई.) स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्याव्यात. २. त्यानंतर दुधी आणि गाजर यांची साले काढून घ्यावीत. ३. आता सर्व भाज्या आणि दोन कांदे नीट बारीक चिरून घ्यावेत. ४. चिरून झाल्यावर सर्व भाज्या हळद आणि मीठ मिक्स केलेल्या कोमट पाण्यामध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात. ५. १५-२० मिनिटे झाल्यानंतर हळद आणि मीठ असलेले पाणी गाळून घ्यावे आणि भाज्या पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्याव्यात. ६. आता एका बाउल मध्ये चिरलेल्या सर्व भाज्या आणि बाजरीचे पीठ ,साहित्यात दिलेले सर्व मसाले (संडे मसाला, हळद पूड, मिरची पूड, धने-जिरे पूड, तीळ, आणि मीठ) घालून नीट मिक्स करून घ्यावे व ते नीट एकजीव करावे. ७. आता ह्या मिश्रणापासून छोटे छोटे गोळे बनवावेत.

 

Recipe in English