•मुख्यसाहित्य: १. झुकिनी - २ २. लसणाच्या पाकळ्या - ४ ३. मीठ - चवीप्रमाणे४. तेल - २ थेम्ब (आवश्यक असल्यास)
पध्दत :
१. सर्वप्रथम झुकिनीची दोन्ही टोके कापून घ्यावीत.२. आपण झुकिनी नूडल्स ४ वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो.३. खाली दिलेल्या ४ पद्धतींपैकी कोणतीही पद्धत वापरून व उपलब्ध साहित्यानुसार आपण हे नूडल्स बनवू शकतो.
अ) स्पायरलाईझर: (ऑनलाईन विकत मिळते):१. स्पायरलाईझरच्या ब्लेडच्या बारीक भागामध्ये झुकिनी ठेवावी आणि गोलाकार फिरवावी.२. जसजशी झुकिनी ब्लेंडमधून पुढे सरकेल तसतसे नूडल्स दुसऱ्या भागामधून बाहेर निघतात.३. झुकिनीचा आतील भाग जो उरतो त्याचे सुरीने बारीक तुकडे करून घ्यावेत.
ब) व्हेजिटेबल पीलर:१. झुकिनी एका हातामध्ये पकडावी आणि दुसऱ्या हातामध्ये व्हेजिटेबल पीलर घेऊन झुकिनीचे पातळ पापुद्रे (स्लाइस) काढावेत.२. नंतर सुरी वापरून हे पापुद्रे उभट नूडल्स च्या आकारामध्ये कापून घ्यावेत.
क) ग्रेटर (खिसणी):१. एका हातामध्ये झुकिनी पकडावी आणि दुसऱ्या हातामध्ये ग्रेटर (खिसणी).२. आता झुकिनी उभी (व्हर्टिकल) ह्या ग्रेटर (खिसणीवर) वर स्लाईड करावी (खिसुन घ्यावी).३. झुकिनी उभी खिसल्यामुळे आपल्याला नूडल्स प्रमाणे तंतू मिळतील.
ड) व्हेजिटेबल स्लाईसर:१. स्लाईसर चॉपिंग बोर्ड वर ठेवावा.२. आता ह्यावरून झुकिनी उभी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरवावी, जेणेकरून झुकिनीचे समान आकाराचे पापुद्रे चॉपिंग बोर्ड वर जमा होतील.३. आता सुरी चा वापर करून हे पापुद्रे नूडल्स च्या आकारामध्ये कापून घ्यावेत.४. आता एक तवा हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर ठेवावा आणि आवश्यक असल्यास त्याला ब्रशने २ थेम्ब तेल लावून घ्यावे व तो गरम होऊ द्यावा. तवा तापल्यावर त्यावर लसणाच्या चार पाकळ्या ठेवाव्यात आणि खरपूस परतून घ्याव्यात.५. नंतर ह्यामध्ये झुकिनी नूडल्स मिक्स करावेत आणि नीट परतून घ्यावेत.६. चवीप्रमाणे मीठ ह्यामध्ये मिक्स करावे.७. हे नूडल्स ५-१० मिनिटांसाठी नीट शिजवून घ्यावेत. हे जास्त शिजवू नयेत अन्यथा ते मऊ पडू शकतात.
मैदा किंवा गव्हाच्या नूडल्स ना हे झुकिनीचे नूडल्स कमी कॅलरीयुक्त, ग्लूटेन विरहित, चविष्ट आणि सोपा पर्याय ठरू शकतात. त्यामुळे आपण सर्वजण हे नूडल्स अगदी निःसंकोचपणे खाऊ शकतो.