Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

कमी-कॅलरीजचा सफेद पास्ता

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. फ्लावर - ५०० ग्रॅम २. पास्ता - २०० ग्रॅम (कच्चा) ३. कांदा - १ ४. तांदळाचे पीठ - २/३ मोठा चमचा ५. दूध - १५० मिली ६. लसणाच्या पाकळ्या - ४/५ ७. हिरव्या मिरच्या - २ ८. मीठ - चवीनुसार ९. ओरेगॉनो (पाककृतीत वापरली जाणारी एक वनस्पती) - चवीनुसार १०. चिली फ्लेक्स - चवीनुसार ११. डेक्सट्रोज - १ मोठा चमचा (ऐच्छिक)

 

पध्दत :

१. कांदा बारीक चिरावा.

२. उपलब्धता व निवडीनुसार हॉटप्लेट / गॅस / स्टोव्ह वर प्रेशर कुकर गरम करावा.

३. त्यात चिरलेली लसूण, हिरवी मिरची व कांदा घालावा. सर्व नीट परतून घ्यावे.

४. त्यात थोडे मीठ घालावे.

५. त्यात फ्लॉवरचे तुरे घालून सर्व पुन्हा परतून घ्यावे.

६. नंतर या मिश्रणात दूध घालावे व पुन्हा चांगले परतावे.

७. एक किंवा दोन शिट्या होईपर्यंत शिजवावे.

८. आता कुकरचे झाकण काढून तो थंड होऊ द्यावा. हे मिश्रण थंड होताच मिक्सर / ग्राइंडरमध्ये घालून बारीक करून घ्यावे. आवश्यकता असल्यास त्यात थोडे दुध किंवा पाणी घालावे.

९. हे मिश्रण मलई सारखे मऊ व घट्ट झालेले असावे.

१०. आता कच्चा पास्ता पाण्यात घालून उकळवावा व त्यात थोडे मीठ घालावे.

११. अशाप्रकारे शिजवलेल्या पास्तातून पाणी गाळून/निथळून घ्यावे.

१२. हे गाळून घेतलेले पाणी / स्टॉक, पांढरा सॉस बनवण्यासाठी वापरता येते.

१३. कढई (पसरट भांडे) गरम करून त्यात फ्लॉवर प्युरी घालून चांगले ढवळून घ्यावे.

१४. त्यात आवडीनुसार (ऑरगॅनो, चिली फ्लेक्स इत्यादी) मसाले घालून व्यवस्थित परतून घ्यावे.

१५. आता तांदळाचे भिजवलेले पीठ (तांदळाच्या पीठात पाणी घालून एकजीव पेस्ट बनवावी) त्यात घालावे.

१६. ह्यात गुठळ्या होऊ नयेत ह्यासाठी चांगले ढवळावे.

१७. एकदा का हे मिश्रण जाड झाले की आपला पांढरा सॉस तयार झाला असे समजावे.

१८. एक वेगळे भांडे गरम करून त्यात हा सॉस घालावा व चांगला हलवून घ्यावा.

१९. ह्या भांड्यात आता उकडलेला पास्ता घालावा.

२०. आवश्यक असल्यास पुन्हा मसाले व मीठ घालावे.

२१. आता हे मिश्रण चांगले ढवळत रहावे व उकळावे.

२२. हा पदार्थ गरम गरमच, लगेच वाढावा.

हा पांढरा सॉस इतर कोणत्याही भाज्यांसोबत वापरल्या जाऊ शकतो किंवा सलादासोबतही खाल्ला जाऊ शकतो. जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे. दोषीपणाची भावना बाजूला सारुन ह्या कमी कॅलरीजच्या पाढंर्‍या पास्ताचा आस्वाद जरुर घ्यावा.

 

English