•मुख्यसाहित्य: १. गाजर - १०० ग्रॅम २. कोबी - १०० ग्रॅम ३. फ्लावर - १०० ग्रॅम ४. फ्रेंच बीन्स (फरसबी) - ५ ५. हिरवा मसाला (वाटप) - १ टीस्पून (छोटा चमचा) ६. मीठ - चवीनुसार ७. मिश्र हर्ब्स - १/२ टीस्पून (छोटा चमचा) ८. चिली (मिर्ची) फ्लेक्स - १/२ टीस्पून (छोटा चमचा) ९. तांदूळ पीठ - १ टेबलस्पून (मोठा चमचा) १०. भाजीपाला स्टॉक - २०० मिली (भाज्यांचे मोठे तुकडे करून पाण्यात उकळवणे)
पध्दत :
१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५-२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५-२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.२. गाजर, कोबी, फ्लावर व फरसबी ह्या सर्व भाज्या चिरून घ्याव्यात.३. चिरलेल्या सर्व भाज्या सुमारे १० मिनीटे वाफवून घ्याव्यात.४. तांदळाच्या पिठाची पेस्ट करून घायवी.५. सॉस पॅन (लांब दांडा व पुष्कळदा झाकण असलेले अन्न शिजवण्याचे एक पसरट भांडे), हॉटप्लेट / स्टोव्ह / गॅसवर ठेवून गरम करून घ्यावे व त्यामध्ये भाजीपाल्याचा स्टॉक घालावा (उकडलेल्या भाज्यांचे उर्वरित पाणी).६. या भाज्यांच्या स्टॉकमध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट (हिरव्या मसाल्याचे वाटप) घालावी.७. आता सर्व उकडलेलया भाज्या त्यात घालून, अगदी कमी तेलात व्यवस्थित परतून घ्याव्यात.८. त्यात मीठ, चिली (मिर्ची) फ्लेक्स व मिश्र हर्ब्स घालून सर्व व्यवस्थित ढवळावे.९. आता या मिश्रणात तांदळाच्या पीठाची पेस्ट घालावी व असे करताना सतत ढवळत राहावे जेणेकरून मिश्रणात गुठळ्या तयार होणार नाहीत.१०. आता ह्या मिश्रणाला उकळी आणावी.११. हा सूप गरमच वाढावा.१२. आपल्या ह्या आरोग्यदायी व कमी-कॅलरीजच्या व्हेजिटेबल क्लिअर सूपचा उपभोग घ्यावा.