Sun Jun 11 2023
कमी कॅलरीजचे व्हेजिटेबल चाट बास्केट
साहित्य
• मुख्यसाहित्य: १. कोबी – १५० ग्रॅम २. गाजर – ३ नग ३. उकडलेले बटाटे – २ नग ४. कांदा – १ नग ५. टोमॅटो – १ नग ६. कोथिंबीर – १ टेबलस्पून (मोठा चमचा) ७. संडे मसाला / लाल तिखट – १/२ टीस्पून (छोटा चमचा) ८. मीठ – चवीनुसार ९. चाट मसाला – १/२ टीस्पून (छोटा चमचा) १०. गोड चटणी – १/२ टीस्पून (छोटा चमचा) ११. हिरव्या मिर्चीची चटणी – १/२ टीस्पून (छोटा चमचा) किंवा १२. कोणताही सॉस/चटणी उपलब्धतेनुसार [केवळ टॉपिंगसाठी/भुरभुरवण्यासाठी – १/२ टीस्पून (छोटा चमचा)> १३. सिलिकॉन मोल्ड (सिलिकॉनचा साचा) किंवा १४. अॅल्युमिनियम मोल्ड (अॅल्युमिनियमचा साचा)
१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५–२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५–२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. २. आता कोबी आणि गाजर किसून घ्यावा. ३. टोमॅटो, बटाटा, कांदा आणि कोथिंबीर सर्व बारीक चिरून घ्यावे. ४. आता किसलेल्या कोबी व गाजरामध्ये संडे मसाला / लाल मिरची पावडर व मीठ घालावे आणि हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यावे. ५. आता या मिश्रणाचे छोटे–छोटे भाग करुन त्यातून सर्व पाणी दाबून काढावे. ६. सिलिकॉन / अॅल्युमिनियमच्या साच्यामध्ये बास्केट / केटोरीचा आकार देण्यासाठी हे मिश्रण त्यात दाबून भरावे. ७. आता हे साचे एयर–फ्रायअर किंवा ओव्हनमध्ये ७–८ मिनिटांसाठी १८०–२०० डिग्री तपमानावर बेक करावे. ८. अशाप्रकारे तयार झालेले बास्केट कुरकुरीत व सोनेरी तपकिरी रंगाचे असावे. ९. आता हे बेक झालेले बास्केट काढून ताटात वाढावे. १०. चिरलेला बटाटा, टोमॅटो, कांदा व सॉस / चटणी या बास्केटमध्ये घालावे. त्यावर कोथिंबीर घालून थोडा चाट मसाला भुरभुरावा. ११. अशाप्रकारे हे बास्केट सज्ज झाले की लगेच वाढावे नाहीतर ते मऊ होईल.
आपल्या ह्या आवडत्या कमी कॅलरीजच्या चाटचा आस्वाद घ्यावा. हा पदार्थ संपूर्ण जेवणाला ही एक पर्याय ठरु शकतो किंवा कुटुंबासाठी वा एखाद्या मेजवानीसाठीही हा इव्हिंग स्नॅक्स (संध्याकाळचा अल्पोपहार) म्हणून एक चांगला पर्याय असू शकतो / ह्याचा बेत केला जाऊ शकतो.