Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

पालक थालीपीठ

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. पालक – १ जुडी २. कोबी – ५०० ग्रॅम किंवा २५० ग्रॅम (आवडीनुसार) ३. कोथिंबीर – १ लहान वाटी ४. हळद – १/४ टीस्पून (छोटा चमचा) ५. मिरची पूड / संडे मसाला – १/२ टीस्पून (छोटा चमचा) ६. चाट मसाला – १/४ टीस्पून (छोटा चमचा) ७. धणे-जिरे पावडर – १/२ टीस्पून (छोटा चमचा) ८. मीठ – चवीनुसार ९. बाजरीचे पीठ – २ टेबलस्पून (मोठे चमचे) १०. तांदळाचे पीठ – २ टेबलस्पून (मोठे चमचे) ११. तेल – फक्त भांड्याला आतून लावून घेण्यापुरते

 

 

पध्दत :

१. पालकाची एक जुडी, कोबी व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

२. एका भांड्यात हे सर्व साहित्य घ्यावे.

३. त्यात हळद, तिखट, चाट मसाला, मीठ, धणे-जिरे पावडर घालावे.

४. आता त्यात बाजरी आणि तांदळाचे पीठ घालावे.

५. सर्वकाही व्यवस्थित मिसळून घ्यावे, त्यात पाणी अजिबात घालू नये कारण पालक स्वतःच पीठ मुरवून घेते.

६. गॅस / स्टोव्ह किंवा हॉटप्लेटवर तवा गरम करत ठेवावा व त्यास ब्रशने एक थेंब तेल लावून घ्यावे.

७. पालकच्या मिश्रणाचे छोटे भाग करुन थालीपीठाप्रमाणे तव्यावर टाकून घ्यावे.

८. साधारणत: १ मिनिट झाकून ठेवावे.

९. आता हे परतावे आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत व सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे.

१०. दही किंवा घरगुती सॉस / चटणी बरोबर गरम गरम वाढावे.

११. आपल्या लो-कॅलरी पालक थालीपीठचा आस्वाद घ्यावा.

कृपया नोंद घ्यावी:

हवे असल्यास कांदा ही घालू शकतो किंवा वरील कृतित सांगितल्याप्रमाणे कांदा आणि लसूणशिवाय ही ह्याचा आस्वाद घेता येऊ शकतो (विशेष करुन पूजा किंवा पवित्र सणांच्या वेळी, वगैरे.).

 

English