Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

लो-कॅलरीजचा व आरोग्यदायक तांदळाचा रवा

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य:

१. तांदूळ - १५० ग्रॅम

 

पध्दत :

१. स्ट्रेनर (चाळणी सदृश्य भांडे) मध्ये १५० ग्रॅम तांदूळ ३ ते ४ वेळा धुवून घ्यावा. २. सर्व पाणी निथळून घ्यावे. ३. हा धुवून घेतलेला तांदूळ, साध्या स्वच्छ कापडावर पसरावा. ४. ह्यास ५ ते ६ तास पूर्णपणे वाळवून घ्यावे. (आवडीनुसार वा उपलब्धतेनुसार पंख्याखाली किंवा सूर्यप्रकाशामध्ये) ५. पूर्णपणे वाळल्यावर, मिक्सरमध्ये त्याचे रवाळ पीठ होईपर्यंत भरडून घ्यावे. ६. तांदळाचा हा रवा एका हवाबंद डब्यात साठवावा व फ्रिजमध्ये ठेवावा. ७. योग्यरित्या साठवल्यास हा १ ते २ महिने टिकू शकतो. ८. हा रवा- उपमा, सांजा, इडली, किंवा गोड शिरा बनवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ९. ह्याला आपण नेहमीच्या रव्यासारखे वापरू शकतो. १०. हा आरोग्यदायक तर आहेच शिवाय त्यात कॅलरीज् ही कमी आहेत.

English


Reader's Comments


Submit Your Comments