Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

लाल भोपळ्याचे रायते

 

 

साहित्य

   १. लाल भोपळा – २५० ग्रॅम    २. साखर – १/४ चमचा (जर भोपळा गोड नसेल तर)    ३. मीठ – चवीनुसार    ४. जिरे – १/४ चमचा    ५. हिरवी मिरची – १ नग    ६. दही – २ मो टेबलस्पून (मोठा चमचा)    ७. कोथिंबीर – १ टेबलस्पून (मोठा चमचा)

 

पध्दत :

१.     प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५–२० मिनिटं भिजवून  घ्याव्यात. त्यानंतर, १५–२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. २.     भोपळ्याचे लहान चौकोनी आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. ३.     साधारण ५ ते ८ मिनिटे या लाल भोपळ्याच्या तुकड्यांना वाफवून घ्यावे. ४.     आता आवडीनुसार व उपलब्धतेनुसार हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर भांडे गरम करुन घ्यावे. ५.     भांडयात जिरे व हिरवी मिरची घालावी आणि चांगले परतून घ्यावे. ६.     आता त्यात वाफवलेल्या भोपळ्याचे तुकडे घालावेत व पुन्हा चांगले परतून घ्यावे. ७.     यामध्ये मीठ व साखर घालावी व पुन्हा एकदा नीट परतून घ्यावे. ८.     भांड्यावर झाकण ठेवून सर्व पुन्हा ५ मिनिटे वाफवून घ्यावे. ९.     आता गॅस बंद करुन हे सर्व थंड होऊ द्यावे. १०.     थंड झाल्यावर त्यात दही घालावे व सर्व नीट ढवळून घ्यावे. ११.     सरतेशेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व सर्व चांगले मिसळावे. १२.     आता हे रायते खाण्यासाठी तयार झाले आहे. १३.     हे रायते आपण एकतर फ्रीजमध्ये थंड करुन ते सॅलडसारखे खाऊ शकतो किंवा १४.     हे रायते आपण भात / भाकरी / चपाती बरोबर ताबडतोब खाऊ शकतो. १५.    ह्या रायत्यामध्ये खूपच कमी कॅलरीज आहेत कारण ह्यामध्ये जराही तेल वापरण्यात आलेले नाही. पण हे तितकेच चवदार व आरोग्यदायी आहे.  

 

English