Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

कमी कॅलरीयुक्त तेलविरहित पाव-भाजी

 

साहित्य:

१. उकडलेले बटाटे: ६ छोटे /५ मध्यम आकाराचे २. फ्लॉवर: १ माध्यम आकाराचा ३. टोमॅटो: ३ ४. कांदे: ४ लहान/३ मध्यम आकाराचे ५. सिमला मिरची: १ ६. पाव-भाजी मसाला: १ टेबल स्पून ७. लाल काश्मिरी पावडर: १ टी स्पून ८. चाट मसाला: १/२ टी स्पून ९. मीठ: चवीप्रमाणे १०. हिरवे वाटण: १ टी स्पून

सजावटीकरिता: १. कोथिंबीर २. कांदा: १ बारीक चिरलेला ३. लिंबू: अर्धे

 

 

पद्धत:

१. प्रथम साहित्यात दिलेल्या सर्व भाज्या त्यांच्या सालींसकट हळद आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात, आणि १५-२० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. २. आता टोमॅटो चार भागांमध्ये चिरून घ्यावा. ३. फ्लॉवरच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. ४. आता कांद्याच्या साली काढून ते सुद्धा चार भागांमध्ये चिरून घ्यावेत. ५. एका मिक्सरमध्ये चिरलेले टोमॅटो आणि कांदे घ्या आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घाला. ६. आता साहित्यात दिल्याप्रमाणे सर्व मसाले: काश्मिरी लाल पावडर, पाव भाजी मसाला, आणि थोडेसे मीठ ह्यामध्ये मिक्स करा. ७. सर्व गोष्टी मिक्सरमध्ये नीट वाटून घ्या जेणेकरून त्याची एकजीव पेस्ट तयार होईल (कांदा-टोमॅटो पेस्ट). ८. आता एका हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर एक कुकर गरम करत ठेवावा आणि ह्यामध्ये एक शिट्टी होई पर्यंत फ्लॉवरच्या पाकळ्या उकडून घ्याव्यात. ९. आता एक कढई गरम करावी आणि ह्यामध्ये हिरवे वाटण नीट परतून घ्यावे. १०. ह्यामध्ये कांदा-टोमॅटो पेस्ट घालून पुनः नीट परतावे. ११. आता ह्या मध्ये सिमला मिरची मिक्स करावी आणि सर्व गोष्टी नीट परताव्यात. १२. उकडलेले बटाटे आणि फ्लॉवर कुस्करून ह्यामध्ये मिक्स करावे व त्यात चाट मसाला आणि मीठ घालावे. १३. आता स्मॅशर च्या साहाय्याने सर्व भाज्या एकजीव होईपर्यंत नीट स्मॅश करून घ्याव्यात. १४. आता हि भाजी ५-७ मिनिटांसाठी नीट शिजू द्यावी. १५. नीट शिजल्यावर हि भाजी एका प्लेट/बाउल मध्ये घ्यावी आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर सजावटी साठी घालून घ्यावी आणि वरून थोडेसे लिंबू पीळावे. १६. हि भाजी तुम्ही घरी बनवलेल्या तांदळाच्या/ज्वारीच्या ब्रेड सोबत किंवा तुमच्या आवडीच्या पावासोबात खाऊ शकता. १७. चला तर ह्या कमी कॅलरीयुक्त तेलविरहित पाव-भाजीचा आस्वाद लुटुयात.

 

English