Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

तेलविरहित कमी कॅलरीजची पालक पनीरची भाजी

 

साहित्य:

१. पालक - १ जुडी २. टोमॅटो - २ ३. कांदा - १ ४. हळद - १/४ चमचा ५. संडे मसाला - १ चमचा ६. धणे-जिरे पूड - १/२ चमचा ७. लसूण - २ पाकळ्या ८. दूध - १/४ कप / ५० मिली ९. घरी बनविलेले पनीर - १०० ग्रॅम १०. चाट मसाला - १ चिमूटभर ११. मीठ - चवीनुसार

 

पद्धत:

१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५–२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५–२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. २. पालक साधारणपणे चिरून घ्यावा. ३. गॅस / स्टोव्ह / हॉटप्लेटवर प्रेशर पॅन (भांडे) ठेवावे आणि त्यात कच्चा चिरलेला पालक, कांदा व टोमॅटो घालावा. ४. त्यात अर्धा ग्लास पाणी घालावे व १/४ चमचा मीठ घालावे. ५. हे सर्व नीट हलवून व्यवस्थित परतून घ्यावे आणि १-२ शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे. ६. आता या प्रेशर पॅनचे झाकण उघडून सर्व नीट ढवळून घ्यावे. ७. हे मिश्रण थंड झाल्यावर याची मऊसूत प्युरी बनवावी. ८. प्युरी बनवताना, त्यात चिरलेल्या लसूण पाकळ्यांपैकी अर्धा भाग, संडे मसाला, धणे-जिरेपूड, मीठ व दूध घालावे आणि सर्व बारीक वाटून घ्यावे. ९. हॉटपलेट / गॅस / स्टोव्हवर कढई गरम करून त्यात चिरलेल्या लसणाचा उरलेला अर्धा भाग घालून, साधारणत: ३० मिनिटे, लसूण तपकिरी होईपर्यंत नीट परतून घ्यावे. १०. आता त्यात पालक प्युरी, हळद व मीठ आणि चिमूटभर चाट मसाला (चव वाढवण्यासाठी) घालावा. यात भाज्यांचा स्टॉक देखील घालावा. ११. आता त्यावर झाकण ठेवून सर्व ५-७ मिनिटे मंद आचेवर उकळवावे. १२. यानंतर, एकदा परतून घ्यावे आणि त्यात घरगुती पनीरचे चौकोनी तुकडे घालावेत व गॅस / हॉटप्लेट बंद करावा. १३. आता आपली तेलविरहित कमी कॅलरीजची पालक पनीर भाजी तयार झाली आहे. ही भाजी आपण गरम पोळी, भाकरी, पाव किंवा भाताबरोबर वाढू शकता.

 

English