•मुख्यसाहित्य: १. मूग डाळ (पिवळी) - १५० ग्रॅ २. मीठ - चवीनुसार ३. डेक्स्ट्रोज – १/२ छोटा चमचा (इच्छेनुसार) ४. हिरवी मिरची – १/२ ५. आलं - १/४ तुकडा ६. कोथिंबीर - १/२ छोटा चमचा
•लज्ज्तदार बनविण्यासाठी / विशेष स्वाद आणण्यासाठी: १. हळद - १/४ छोटा चमचा २. जिरे - १/४ छोटा चमचा ३. मोहरी - १/४ छोटा चमचा ४. हिंग – एक चिमूटभर ५. तेल – थोडेसे (ब्रशने भांड्याला आतुन हलकेसे लावण्यापुरते)
पध्दत :
१. पिवळी मूगडाळ स्वच्छ धुऊन १ तास पाण्यात भिजत ठेवावी.
२. साधारण एका तासानंतर पाणी निथळून घ्यावे.
३. ही भिजवलेली मूगडाळ, हिरवी मिरची व आले मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यावे.
४. हे मिश्रण जाडसरच वाटून घ्यावे (बारीक पीठ करु नये).
५. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे व त्यात मीठ, डेक्स्ट्रोज, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
६. सर्व नीट ढवळावे.
७. फोडणी घालायच्या भांड्यात हळद, मोहरी, जिरे व हिंग घालावे.
८. मोहरी तडतडू लागल्यावर वाटलेले मिश्रण त्यात घालावे व आवश्यकता वाटल्यास त्यात थोडे पाणी घालावे.
९. आता सर्व पुन्हा व्यवस्थीत ढवळून घ्यावे.
१०. अप्पेपात्राच्या प्रत्येक खोलगट खाचेस एक थेंब तेल ब्रशने लावावे व त्यात अर्धा चमचा वरील मिश्रण घालावे. साधारणपणे १-२ मिनिटे झाकून ठेवावे.
११. त्यानंतर, खालची बाजू वर परतून घ्यावी व कुरकुरीत तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजू द्यावे.
१२. आता हे गरमागरम मुगडाळ पनियारम थंड दही/घरगुती सॉस/चटणी सोबत वाढावे.
१३. हा अल्पोपाहारासाठी, नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो.
१४. या कमी कॅलरीजच्या तरीही चविष्ट, आरोग्यादायी व पौष्टिक मूगडाळ पनियारमचा आस्वाद जरुर घ्या !