Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

मस्त कोबी (स्वादिष्ट कोबी)

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. कोबी - ५००ग्रॅम २. मीठ - चवीनुसार ३. चाट मसाला - चिमूटभर रुचिनुसार ४. मॅजिक-ए-मसाला (मॅगी) - १ सॅशे ५. कोथिंबीर - सजावटीसाठी

 

पध्दत :

१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५–२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५–२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.

२. आता कोबी पातळ उभा चिरावा किंवा बारीक चिरावा.

३. नंतर कोबी वाफवून घ्यावा.

४. आता आवडीनुसार व उपलब्धतेनुसार हॉटप्लेट / गॅस / स्टोव्ह वर एक पसरट भांडे गरम करुन घ्यावे.

५. ह्या भांड्यात (पॅन) उकडलेला कोबी घालावा व साधारण पणे २ मिनिटे तरी भांड्यात नीट परतून घ्यावा.

६. आता त्यात मीठ, मॅजिक-ए-मसाला घालावा व सर्व परत नीट परतून घ्यावे.

७. आता ह्या परतलेल्या कोबीवर थोडा चाट मसाला भूरभूरावा व कोथिंबीरीने सजवावे.

८. हा पदार्थ गरमच वाढावा. आपल्या कमी-कॅलरीजच्या स्वादिष्ट कोबी वेजीज्‍चा (मस्तकोबी) आस्वाद चपाती, भाकरी किंवा भाता बरोबर घ्यावा.

 

खव्व्यांच्या डबा किंवा जेवणासाठी, हा एक उत्त्म, सोपा, साधा आणि पटकन तयार होणारा असा पर्याय आहे. आहारा वर नियंत्रण ठेवणार्‍यांसाठी देखील हा एक चांगला पर्याय आहे. ही एक पटकन तयार होणारी, आरोग्यदायक व चवदार पाककृती आहे. कमी कॅलरीजचा मस्त कोबी (स्वादिष्टकोबी). 

 

English