•मुख्यसाहित्य:१. फ्लावर – १०० ग्रॅम (लहान मोहोर/तुरे)२. कोबी – १५० ग्रॅम (पातळ लांब काप)३. भोपळी मिर्ची – १ (पातळ लांब काप)४. कांदा – १ (पातळ लांब काप)५. मिश्र हर्ब्स / कोथिंबीर-जिरे पावडर – १/२ टीस्पून (छोटा चमचा)६. लसूण – २ पाकळ्या (चिरलेल्या)७. आलं (चिरलेले)८. चाट मसाला – १/२ टीस्पून (छोटा चमचा) ९. चिली (मिर्ची) फ्लेक्स / लाल तिखट – १/२ टीस्पून (छोटा चमचा)१०. मीठ – चवीनुसार११. तेल – फक्त भांड्याला आतून लावून घेण्यापुरते (एक थेंब)
पध्दत :
१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५–२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५–२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.२. सर्व भाज्यांचे वर नमूद केल्याप्रमाणे लांब पातळ काप काढावेत.३. गॅस / स्टोव्ह / हॉटप्लेटवर, उपलब्धतेनुसार, सर्व भाज्या १०–२० मिनिटे वाफवून घ्याव्यात.४. आता एका पॅनला (पसरट भांड्याला) हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर गरम करावे व एक थेंब तेल भांड्याला लावून घ्यावे.५. प्रथम, या भांड्यात चिरलेली लसूण किंवा आले घालावे आणि नंतर सर्व उकडलेले भाज्या त्यात घालाव्यात.६. आता हे सर्व नीट हलवून व्यवस्थित परतून घ्यावे.७. आता सर्व मसाला (चाट मसाला, मिश्र हर्ब्स / कोथिंबीर-जिरे पावडर, लाल तिखट / चिली (मिर्ची) फ्लेक्स आणि मीठ) ह्यात घालावा.८. पुन्हा, सर्व ५ मिनिटे व्यवस्थित परतून घ्यावे.९. हा कमी कॅलरीजचा परतलेल्या भाज्यांचा स्वादिष्ट पदार्थ गरम-गरमच वाढावा.