१. तांदळाचे पीठ – १५० ग्रॅम२. किसलेले गाजर - ७५ ग्रॅम३. कोबी - ७५ ग्रॅम४. मिरची - १५. आले - छोटा तुकडा (बारीक चिरलेले आले व मिरची)६. हळद - १/४ टीस्पून (छोटा चमचा)७. मोहरी - १/४ टीस्पून (छोटा चमचा)८. जिरे – १/४ टीस्पून (छोटा चमचा)९. मीठ – चवीनुसार१०. डेक्स्ट्रोज साखर - १ टीस्पून (छोटा चमचा) (दही आंबट असल्यास)११. दही - २ टेबलस्पून (मोठा चमचा)१२. तेल - थोडेसे, फक्त भांड्याला आतून लावून घेण्यापुरते १३. पाणी - १ ग्लास१४. कोथिंबीर - सजावटीसाठी
पध्दत :
१. एका भांड्यात दही घेऊन ते फेटावे.२. त्यात हळूहळू पाणी घालावे व त्याचे ताक बनवावे.३. यामध्ये मीठ व डेक्स्ट्रोज साखार घालावी.४. नंतर त्यात तांदळाचे पीठ घालावे.५. आता ह्यात अर्धी हळद घालावी व हे मिश्रण व्यवस्थित ढवळावे जेणेकरून त्यात एकही गुठळी तयार होणार नाही व ते एकजीव होईल.६. निवड व उपलब्धतेनुसार, एक कढई, हॉटप्लेट / गॅस बर्नर / स्टोव्ह वर गरम करुन घ्यावी.७. एक थेंब तेल कढईला आतून लावून घ्यावे.८. नंतर त्यात मोहरी व जिरे घालून चांगले भाजून घ्यावे.९. आता बारीक चिरलेले आले, मिरची व उरलेली हळद घालावी.१०. आता वरील यादीप्रमाणे किसलेले गाजर व कोबी यामध्ये घालून सर्व नीट २ मिनिटे तरी परतून घ्यावे.११. या मिश्रणात तांदळाचे पीठ घालावे.१२. आता हे मिश्रण चांगले मिसळण्यासाठी व्यवस्थित ढवळावे. आवश्यक असल्यास, आपण यामध्ये पाणी घालू शकतो.१३. आता हे सर्व झाकून ५ ते १० मिनिटे शिजवावे.१४. ह्या मिश्रणाचे १० मिनिटांत जाड पीठ तयार होईल.१५. हे योग्यरित्या उकड काढलेले असेल.१६. आता ह्यात कोथिंबीर घालावी.१७. आता तांदळाची उकड खाण्यासाठी तयार झाली आहे. ही गरमगरमच वाढावी.
आपल्या न्याहारीसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. एकवेळच्या जेवणाची पूर्णता एक वाडगा उकड सेवनाने होऊ शकते. ही उकड आपण लोणचे किंवा चटणीबरोबर ही खाऊ शकतो.