Sun Jun 11 2023
कमी कॅलरीयुक्त नॉन-फरमेंटेड झटपट उत्तप्पा
साहित्य
• बॅटर/मिश्रण बनवण्यासाठी: १. उडीद डाळ - २०० ग्रॅम २. हिरवी मिरची - १ (मध्यम आकाराची) ३. आले - १ टी स्पून ४. मीठ - चावी प्रमाणे ५. पाणी - दीड ग्लास
• उत्तपा बनवण्यासाठी: १. उडीद डाळ मिश्रण (नॉन फेरमेंटेड)/ न आंबवलेले २. कांदा (चिरलेला) - १ ३. टोमॅटो (कापलेला) - १ ४. कोथिंबीर - १/२ वाटी ५. मिरची पूड- १/२ टी स्पून ६. धने- जिरे पूड - १/२ टी स्पून ७. मीठ- चवीप्रमाणे ८. तेल - फक्त ब्रशिंग करीता
१. प्रथम उडीद डाळ पाण्यामध्ये १५ मिनिटांसाठी भिजत ठेवावी. २. त्यानंतर (१५ मिनिटांनंतर) हि भिजवलेली उडीद डाळ हिरवी मिरची आणि आले मिक्स करून मिक्सरमध्ये नीट वाटून घ्यावी. मिक्सरमद्धे वाटत असताना ह्यामध्ये थोडे थोडे पाणी घालत राहावे जेणेकरून मिश्रणाची कंन्सिस्टंसी नीट राहील. ३. आता हे झटपट ना आंबवलेले मिश्रण (बॅटर) उत्तपा बनवण्यासाठी तयार झाले आहे, हेच मिश्रण वापरून तुम्ही उत्तप्याशिवाय इडली, डोसा, ढोकळा, अप्पे, मेदू वडे सुद्धा बनवू शकता. ४. आता एक तवा उपलब्धतेनुसार हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर गरम करत ठेवावा. ५. एक थेंब तेल ह्या तव्यावर ब्रशच्या साहाय्याने नीट लावून घ्यावे. ६. आता एक डाव वरील मिश्रण तव्यावर नीट पसरून घ्यावे. ७. मिश्रण पसरताना ते हळुवारपणे पसरावे व शक्यतो जाडसरच ठेवावे, खूप पातळ पसरू नये. ८. आता ह्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, धने-जिरे पूड आणि मिरची पूड घालून घ्यावी. ह्यावर एक झाकण ठेवून द्यावे आणि २ मिनिटांसाठी नीट शिजू द्यावे. ९. दोन मिनटे झाल्या वर उत्तपा दुसऱ्या बाजूवर पालटून घ्यावा. १०. दोन्ही बाजूने तो खरपूस होई पर्यंत नीट परतून घ्यावा. ११. ह्या झटपट कमी कॅलरीयुक्त उत्तप्याचा आस्वाद तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी आणि सांबाराबरोबर लुटू शकता.