Sun Jun 11 2023
कमी कॅलरीयुक्त घरगुती पनीर
साहित्य
• मुख्यसाहित्य: १. लो फॅट दूध (टोन्ड मिल्क) - ५०० मिली २. लिंबू - १ ३. रुमाल किंवा पातळ कापड - १ ४. वजन
१. प्रथम ५०० मिली. टोन्ड मिल्क (लो फॅट दूध ) गॅस/स्टोव्ह/हॉटप्लेट वर उकळून घ्यावे. २. ते ५-१० मिनिटांसाठी थंड होऊ द्यावे ३. ते थंड झाल्यावर (५-१० मिनिटांनंतर) त्यामध्ये एक अक्ख्या लिंबाचा रस मिक्स करावा आणि दूध पुन्हा उकळावे. ४. असे केल्यामुळे दूध फाटेल आणि दही वेगळे होईल आणि पाणी वेगळे होईल. ५. आता गॅस/हॉटप्लेट/स्टोव्ह बंद करावा आणि हे फाटलेले दूध एका तलम कापडामध्ये घेऊन त्यातील पाणी गाळून घ्यावे. ६. आता कापडामध्ये उरलेले दूध (दह्याप्रमाणे) कापडासकट स्वछ पाण्याने २-३ वेळा नीट धुवून घ्यावे जेणेकरून लिंबाचा आंबटपणा त्यातून निघून जाईल. ७. आता कापडमधून सर्व पाणी नीट पिळून गाळून घ्यावे. ८. आता तुमचे पनीर कापडामध्ये तयार झाले आहे. ९. ह्या पनीरला कापडामध्ये घट्टपणे बांधून घ्यावे. १०. त्यानंतर हे घट्ट आकारात ठेवण्याकरता आपल्याला हव्या असलेल्या आकाराच्या भांड्यामध्ये गच्च भरून त्यावर जड वजन ठेवावे आणि ते एक तासासाठी ठेवून द्यावे. ११. एक तास झाल्यावर हे पनीर भांड्यातून आणि कापडामधून काढून घ्यावे. आता ते तुम्हाला हव्या असलेल्या आकारामध्ये तयार असेल. १२. ह्याचे तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे तुकडे करू शकता. १३. हे पनीर लगेच तुमच्या हव्या त्या रेसिपी करता वापरू शकत किंवा लगेच वापरायचे नसल्यास रेफ्रिजरेटर मध्ये ठेवू शकता.
महत्वाची सूचना: १. ह्या घरगुती पनीर मध्ये नेहमीच्या पनीर पेक्षा १/३ कॅलरी असतात. २. दूध फाटल्यावर जे पाणी वेगळे होते आणि जे आपण कापडामधून गाळून घेतो ते सुद्धा पौष्टिक असते आणि ते आपण, सूप/भाजी/चपाती बनवण्यासाठी वापरू शकतो. ते शक्यतो टाकून देऊ नये.