•मुख्यसाहित्य: १. टोन्ड मिल्क (दूध)/कमी मलईयुक्त दूध- ५०० मिली २. लिंबू - १ ३. रुमाल किंवा पातळ कापड ४. वजन५. मीठ - चिमूटभर
पध्दत :
१. प्रथम ५०० मिली कमी मलईयुक्त/टोन्ड दूध उकळून घ्यावे.२. ते ५-१० मिनिटांसाठी थंड होऊ द्यावे.३. नंतर ते पुन्हा उकळावे आणि उकळत असतानां त्यामध्ये एक अक्खे लिंबू पिळून घ्यावे.४. असे केल्याने दूध फाटेल आणि त्याचे घटक वेगळे होतील.५. दही आणि पाणी आपण वेगळे झालेले पाहू शकतो.६. आता हे दुधापासून वेगळे झालेले दही गॅस/हॉटप्लेट/स्टोव्ह वरून काढून घ्यावे आणि एका तलम कापडामधून नीट गाळून घ्यावे.७. आता हे कापडामध्येच २-३ वेळा नीट स्वछ पाण्याने धुवून घ्यावे जेणेकरून लिंबाचा आंबटपणा निघून जाईल.८. आता सर्व पाणी गाळून घ्यावे आणि कापडामध्ये नीट पिळून घ्यावे.९. आता तुमचे पनीर तयार झाले आहे.१०. हे पनीर कापडामध्ये घट्ट बांधून घ्यावे आणि त्यावर वजन ठेवून द्यावे.११. आता एका मिक्सर मध्ये हे पनीर चिमूटभर मीठ मिक्स करून वाटून घ्यावे.१२. क्रीमी इफेक्ट मिळेपर्यंत हे वाटून घ्यावे.१३. आता हे मिश्रण एक भांड्यामध्ये भरून डीप फ्रीझ मध्ये ३-४ तासांसाठी ठेवून द्यावे.१४. आता जेंव्हा ३-४ तासानंतर तुम्ही हे भांडे डीप फ्रीझ मधून बाहेर काढाल तेंव्हा तुम्हाला घट्ट चीझ मिळेल.१५. आता तुमचे घरगुती चीझ तयार झालेले आहे.१६. ह्या चीझ ची चव मार्केटमध्ये मिळणाऱ्या चीझशी मिळतीजुळती असून इतर चीझ च्या मानाने १/३ कॅलरीच आहेत.
सूचना:१. हे चीझ वापरण्यापूर्वी फ्रीझर मध्येच ठेवलेले चांगले जेणेकरून ते तुम्हाला नीट ग्रेट करता येईल.२. हे चीझ ३-४ दिवस सहजपणे टिकते.३. हे चीझ टॉपिंग म्हणून तुम्ही पिझ्झा, सँडविचेस, रोल्स आणि बर्गरमध्ये वापरू शकता
ह्या कमी कॅलरीयुक्त चविष्ट चीझ चा आस्वाद तुम्ही अगदी मोकळेपणाने लुटू शकता