१. फ्लावर (वाफवलेला) - १ किलो २. बटाटा (उकडलेला) - १ ३. टोमॅटो (बारीक चिरूलेला) - १ ४. कांदा (बारीक चिरूलेला) - २ ५. जिरे - १/४ छोटा चमचा ६. मोहरी - १/४ छोटा चमचा ७. हळद - १/४ छोटा चमचा ८. संडे मसाला - १ छोटा चमचा ९. मीठ - चवीनुसार १०. धणे-जिरे पूड - १/२ छोटा चमचा ११. कोथिंबीर - सजावटीसाठी
पद्धत:
१. निवड व उपलब्धतेनुसार हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर कढई गरम करावी.२. या गरम झालेल्या कढईत, जिरे घालावे व १० सेकंद परतावे.३. नंतर त्यात मोहरी घालून १० सेकंद परतावे.४. या मिश्रणात हळद घालून सर्व लगेच परतावे.५. कांदा, मीठ व बारीक चिरलेले टोमॅटो घालून मऊ होईस्तोवर हे सर्व परतावे व झाकून ठेवावे.६. या मिश्रणात उकडलेला बटाटा घालून २-३ मिनिटे नीट परतावे.७. आता या मिश्रणात वाफवलेला फ्लावर घालावा व पुन्हा नीट परतावे. नंतर त्यात चवीनुसार मसाला व मीठ घालावे.८. आता सर्व नीट ढवळून घ्यावे आणि सर्वकाही व्यवस्थित मिसळ्यावर कढई २० सेकंद झाकून ठेवावी.९. साधारण २० सेकंदांनंतर भाजीत कोथिंबीर घालावी.१०. या तेलविरहित फ्लावरच्या भाजीला पोळी / भाकरी / भाताबरोबर वाढावे.११. आरोग्यदायी, पौष्टिक, चविष्ट व कॅलरीज ही कमी असलेली ही भाजी, टिफिनसाठीदेखील एक चांगला पर्याय ठरु शकते !