•मुख्यसाहित्य: १. दुधी - १ नग (५०० ग्रॅम) २. टोमॅटो - २ नग ३. कांदा - २ नग ४. मीठ - चवीनुसार ५. धणे-जिरेपावडर - १/२ टीस्पून (छोटाचमचा) ६. संडेमसाला - १/२ चमचा (छोटाचमचा) ७. कोथिंबीर - सजावटीपूर्ती
पध्दत :
१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५–२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५–२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२. दुधी भोपळा, कांदा व टोमॅटो चे बारीक तुकडे करुन घ्यावेत.
३. आता आवडीनुसार व उपलब्धतेनुसार हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर कुकर गरम करुन घ्यावा.
४. कुकर मध्ये प्रथम कांदा परतून घ्यावा.
५. ह्यात आधी चिरलेला टोमॅटो घालावा व नंतर दुधी घालावा.
६. आता सर्व नीट परतून घ्यावे. त्यात मीठ व मासाले (संडे मसाला व धणे–जिरे पावडर) घालावेत.
७. ह्यात १/२ ग्लास पाणी घालावे.
८. आता कुकरच्या दोन शिट्या होई पर्यंत शिजवावे.
९. सर्व थंड होऊ द्यावे.
१०. आता हा घट्ट रस्सा (प्युरी) मिक्सर मधनं काढावा. गरज वाटल्यास ह्यात थोडे पाणी घालावे.
११. आता हे मिश्रण एका भांड्यात त्याला गरम करावे. त्याला एक उकळी आणावी.
१२. ह्यावर कोथिंबीर भुरभुरावी व गरमच वाढावे.
१३. ह्या गारठवणार्या थंडीत गरमा गरम चविष्ट लो-कॅलरी सूपचा आस्वाद जरुर घ्या.