•मुख्यसाहित्य: १. दुधी भोपळा - १५० ग्रॅम २. तांदळाचे पीठ - ३ टेबल स्पून किंवा ३. बेसन- ३ टेबल स्पून
•मसाले : १. हळद (पावडर)- १/२ टी स्पून २. संडे मसाला - १ टी स्पून ३. धने- जिरे पूड - १ टी स्पून ४. चाट मसाला- १/२ टी स्पून ५. तीळ - १ टी स्पून ६. मीठ - चवीप्रमाणे ७. तेल- ब्रशिंग करता
•सजावट आणि चव वाढविण्या करिता: १. खोवलेलाल ओला नारळ- १ टेबल स्पून २. कोथिंबीर - १ टेबल स्पून ३. मोहरी- १/२ टी स्पून ४. तीळ- १/२ टी स्पून ५. तेल- ब्रशिंग करता
पध्दत :
१. प्रथम अख्खा दुधी भोपळा हळद आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवा.२. १५-२० मिनिटे झाल्यानंतर हळद आणि मीठाचे पाणी काढून टाका आणि दुधी स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या.३. नंतर हा दुधी भोपळा संपूर्ण किसून घ्या.४. आता किसलेला दुधी ५-१० मिनिटांसाठी वाफवून घ्या. ह्या करता आपल्या सोयीनुसार हॉटप्लेट, गॅस शेगडी किंवा स्टोव्ह चा वापर करू शकतो.५. आता ह्या किसलेल्या आणि वाफवलेल्या दुधी मध्ये तांदळाचे पीठ किंवा बेसन घाला व नीट मिक्स करून घ्या.६. आता साहित्य दिले सर्व मसाले (हळद, संडे मसाला, धने-जिरे पूड, चाट मसाला, तीळ आणि चवीप्रमाणे मीठ) ह्या मिश्रणामध्ये घालून घ्या.७. आता हे सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्या.८. आता हाताच्या तळव्याला 2 थेंब तेल लावा आणि अंगठ्याच्या आकाराचे लांबट गोळे (मुटके) ह्या मिश्रणापासून बनवून घ्या.९. आता हे मुटके परत १० मिनिटांसाठी वाफवून घ्या.आता हे मुटके आपण आपल्या आवडीनुसार चार वेगवेगळ्या पद्धतीनुसार बनवू शकतो. जसे,
पद्धत - १:१. कृती- ७ मध्ये दिल्याप्रमाणे १० मिनिटांसाठी वाफवलेले हे मुटके खाण्यासाठी तयार होतात. तेआपण हवे असल्यास असेच खाऊ शकतो.२. ते गरमा गरम खाणे चांगले.
पद्धत - २:१. आपल्या सोयीनुसार हॉटप्लेट/गॅसशेगडी/स्टोव्ह वर एक तवा तापत ठेवावा.२. ह्या तव्याला ब्रशच्या साहाय्याने २-३ थेंब तेल सर्व बाजूने नीट लावून घ्यावे.३. ह्या वर आता तीळ आणि मोहरी घालावी.४. आता वाफवलेले मुटके तव्यावर ठेवावेत आणि ५ मिनिटांसाठी नीट परतून घ्यावेत.५. एकदा का ते खरपूस व्हायला सुरुवात झाली कि गॅस/हॉटप्लेट/स्टोव्ह बंद करावा.६. कोथिंबीर आणि किसलेला ओला नारळ त्यावर घालून ते सजवावेत.७. आता हे तयार झालेले मुटके गरमा गरम खावेत.
पद्धत - ३:१. सोयीनुसार हॉटप्लेट/गॅस शेगडी/स्टोव्ह वर एक तवा तापत ठेवावा.२. त्याला ब्रशचा वापरकरून २-३ थेंब तेल सर्व बाजूने नीट लावून घ्यावे.३. आता वाफवलेले मुटके तापलेल्या तव्यावर ठेवावेत.४. हे मुटके खरपूस होईपर्यंत (१०-१५ मिनटे) तव्यावर नीट भाजून घ्यावेत.५. ह्या गरमा गरम मुटक्यांचा आस्वाद चटणी किंवा दह्याबरोबर लुटावा.
पद्धत - ४:१. एअर-फ्रायर ५ मिनिटांसाठी अगोदर गरम करून घ्यावा.२. ह्या एअर-फायर मध्ये वाफवलेले मुटके ठेवून १८० अंश तापमानावर १५ मिनिटांसाठी भाजूनघ्यावेत.३. ह्या गरमा गरम मुटक्यांचा आस्वाद चटणी, दही, किंवा सॉस सोबत लुटावा.