Wed Aug 13 2025
गी-यान-बाह-रे सिंड्रोम हा शरीराच्या मज्जासंस्थेसंबंधीचा एक दुर्मिळ विकार आहे. महाराष्ट्रात, विशेषतः पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या गावांमध्ये या विकाराच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. महाराष्ट्रातील नागपूर, सोलापूर यांसारख्या काही इतर शहरांमध्येही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात गी-यान-बाह्-रे सिंड्रोमचा पहिला रुग्ण ९ जानेवारी रोजी पुण्यात आढळला. सध्या, GBS सिंड्रोमची १६६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये ६१ रुग्णांना अतिदक्षता विभागात (ICU) उपचाराची आवश्यकता आहे आणि २१ रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्ट आवश्यक आहे. दुर्दैवाने, आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ५२ रुग्णांना यशस्वीरित्या उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
या लेखात आपण जाणून घेणार आहोत:
गी-यान-बाह्-रे सिंड्रोम (GBS) म्हणजे काय? हा संसर्गजन्य (Infectious) आजार आहे की असंसर्गजन्य (Non-infectious)?
हा आजार कसा विकसित होतो?
याची चिन्हे आणि लक्षणे कोणती आहेत?
या आजाराचे निदान लवकर कसे होऊ शकते आणि याचा त्रास होणार्या रुग्णांसाठी सध्या कोणते उपचार उपलब्ध आहेत?
GBS साठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहेत?साइटोमेगॅलोव्हायरस (Cytomegalovirus)
कोविड-१९ विषाणू (Covid-19 Virus)
हा मज्जासंस्थेसंबंधीचा एक ऑटोइम्यून विकार आहे (Autoimmune स्वप्रतिरक्षात्मक म्हणजे शरीराची स्वतःची रोगप्रतिकारक प्रणाली (Immune System) चुकीने स्वतःच्याच पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे विविध आजार उद्भवू शकतात), जो मानवी शरीराच्या परिघीय मज्जासंस्थेवर (Peripheral Nervous System) परिणाम करतो.
(मज्जातंतु वेदना, तापमान, स्पर्श, स्नायूंची यांच्या संवेदना मेंदू ते मणक्यातून संपूर्ण शरीरामध्ये वाहून नेतात.)
हा आजार विशेषतः संसर्गजन्य (श्वसन किंवा जठरासंबंधीच्या) आजारातून बरे झाल्यानंतर काही दिवसांत विकसित होतो.
या आजारात, व्यक्तीच्या प्रतिकारकशक्ती प्रणाली कडून चुकून परिघीय मज्जातंतूंवर (peripheral nerves) हल्ला केला जातो आणि त्यांच्या संरक्षणात्मक आवरणास नुकसान पोहोचविले जाते.
याचे मुख्य कारण म्हणजे काही विशिष्ट बॅक्टेरिया आणि विषाणूंवर असणार्या रासायनिक संरचना मज्जातंतूंच्या आवरणावर दिसतात. त्यामुळे, पिडीत व्यक्तींच्या प्रतिकारकशक्ती पेशी (Immune Cells) या हा फरक ओळखू शकत नाहीत आणि मज्जातंतूंवर हल्ला करतात.
हा आजार कोणत्याही वयोगटातील किंवा कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीला होऊ शकतो. तरीही प्रौढांमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येते. काही संशोधनांनुसार, प्रामुख्याने ५० वर्षांवरील पुरुषांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो.
हा विकार अचानक उद्भवू शकतो आणि काही तास, दिवस किंवा आठवड्यांमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
याचा परिणाम सौम्य (अशक्तपणा) ते गंभीर स्वरूपात होऊ शकतो, ज्यामुळे हात-पाय आणि श्वासोच्छ्वासाच्या स्नायूंना पक्षाघात (Paralysis) होऊ शकतो व रुग्ण हालचाल करू शकत नाही किंवा स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही.
हा जीवघेणा आजार असू शकतो, परंतु सुदैवाने, लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार केल्यास अगदी गंभीर प्रकरणांमध्येही पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.
जसे आपण आधी बघितले की, हा एक ऑटोइम्यून आजार आहे, जो सहसा जठर व आतडे (Gastrointestinal) किंवा श्वसन मार्गाच्या (Respiratory Tract) संसर्गानंतर बरे झाल्यावर विकसित होतो.
GBS चा धोका वाढवणारे सर्वसामान्य संसर्ग:
फ्लू विषाणू (Flu Virus)
एपस्टाईन-बार विषाणू (Epstein-Barr Virus)
झिका विषाणू (Zika Virus)
साइटोमेगॅलोव्हायरस (Cytomegalovirus)
कोविड-१९ विषाणू (Covid-19 Virus)
एखाद्या व्यक्तीमध्ये हा संसर्ग होण्याची शक्यता वाढवू शकणारे कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी संसर्गाचे हानीकारक घटक पुढीलप्रमाणे आहेत:
कच्च्या किंवा व्यवस्थित न धुतलेल्या भाज्यांचे सेवन करणे.
बाहेर (घरात न बनवलेले) शिजवलेल्या तांदळापासून बनलेले कोणतेही पदार्थ खाणे. (हे बॅक्टेरियांच्या वाढीसाठी विशेषतः कॅम्पायलोबॅक्टर जेजुनीसाठी एक पोषक वातावरण तयार करते.)
कच्चे, नीट पाश्चरायझेशन न केलेले, किंवा योग्य प्रकारे न साठवलेले दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ (जसे की पनीर, चीज, पॅक केलेले दही, योगर्ट, लोणी (बटर), मेयोनीज इत्यादी) यांचे सेवन करणे.
(कारण हे कॅम्पायलोबॅक्टर बॅक्टेरियाच्या वाढीसाठी उत्तम माध्यम आहे.)
कच्चे मांस, कोंबडी किंवा भाज्या कापण्यासाठी एकाच कटिंग बोर्ड किंवा सुरी व भांड्याचा वापर करणे आणि त्यानंतर ती भांडी स्वच्छ न धुणे.
अस्वच्छ, फिल्टर न केलेले किंवा पिण्यायोग्य प्रक्रिया न केलेले पाणी पिणे.
प्रसाधनगृह (toilet) वापरल्यानंतर हात व्यवस्थित न धुणे (यामुळे एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे संक्रमण होणे सहजशक्य होते).
प्राणी किंवा त्यांच्या मलाच्या संपर्कात आल्यानंतर योग्य स्वच्छता न पाळणे.
गी-यान-बाह-रे सिंड्रोम (GBS) चे योग्य वेळी निदान न झाल्यास आणि त्यावर वेळेवर उपचार न मिळाल्यास, हा विकार जीवघेणा ठरू शकतो, कारण तो अत्यंत कमी काळात गंभीर स्वरूप धारण करू शकतो. म्हणून, ‘गी-यान-बाह-रे सिंड्रोमच्या विकासाचे संकेत देणारी लक्षणे ओळखणे महत्वाचे ठरते.
जसे आपण ‘गी-यान-बाह-रे सिंड्रोम बद्दल आधी बघितले आहे की, या विकारात मज्जातंतूंच्या (Nerve Cells) संरक्षणात्मक आवरणाचे नुकसान होते, ज्यामुळे मेंदू ते मणक्यातून (Spinal Cord) स्नायूंपर्यंत जाणार्या संवेदना प्रभावित होतात.
सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत -
स्नायूंची कमजोरी (Muscle weakness):
सुरुवातीला पायांमधील स्नायू कमकुवत होतात, परंतु काही वेळेस हा प्रकार प्रथम हातांमध्येही दिसून येऊ शकतो आणि नंतर हळूहळू श्वसनाच्या स्नायूंमध्ये (Respiratory Muscles) आणि शरीराच्या इतर भागांमधील स्नायूंमध्येही कमकुवतपणा येतो. हा प्रकार काही तासांपासून ते काही दिवस किंवा आठवड्यांत सौम्य ते गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
खालील लक्षणे यामध्ये दिसून येऊ शकतात -
चालताना त्रास होणे.
हाताची पकड (Grip) कमकुवत होणे.
चालताना अस्थिरता, तोल जाणे आणि शरीरातील अवयवांमधील समन्वय बिघडणे.
डोळ्यांभोवतीच्या (बुब्बुळ) स्नायूंमधील कमकुवतपणामुळे दृष्टी समस्या (Vision Problems) येणे.
चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम झाल्यास गिळताना, बोलताना आणि चावताना त्रास होणे.
श्वसनास त्रास होणे; (श्वसन स्नायूंच्या (Respiratory Muscles) सहभागामुळे) ही परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करू शकते आणि हे प्राणघातकही ठरू शकते.
मज्जातंतूंचे नुकसान (Damage to the nerves) :
जर एखाद्या व्यक्तीला ‘गी-यान-बाह-रे सिंड्रोम (GBS) ची लक्षणे दिसत असतील, विशेषतः अलीकडेच झालेल्या जठर व आतडे (Gastrointestinal) किंवा श्वसनसंस्थेच्या (Respiratory) संसर्गानंतर, तर तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे, कारण लवकर उपचार केल्यास आरोग्य सुधारणेमध्ये मोठा फरक पडू शकतो.
पहिली पायरी : वैद्यकिय मूल्यमापन (Clinical Assessment)
डॉक्टर खालील प्रकारे मूल्यमापन करतात.
दुसरी पायरी : निदानात्मक चाचण्या (Diagnostic Tests)
गी-यान-बाह-रे सिंड्रोमची पुष्टी करण्यासाठी डॉक्टर खालील चाचण्या करू शकतात :
जसे की, ‘गी-यान-बाह-रे सिंड्रोम (GBS) वेगाने वाढू शकतो, त्यामुळे लक्षणांवरून आजाराचे लवकर निदान होणे आणि वैद्यकीय उपचार लवकरात लवकर घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा योग्य वैद्यकीय व्यवस्थापनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला किंवा तुमच्या परिचितांना स्नायू कमजोरी (Muscle Weakness) किंवा मज्जातंतूंशी संबंधित अस्वाभाविक लक्षणे (Nerve-related Symptoms) जाणवत असतील, तर तात्काळ आरोग्यविषयक तज्ञांचा सल्ला घ्या.
प्लाझ्मा (रक्ताचा द्रव्य घटक) रक्तपेशींपासून वेगळा केला जातो, (कारण प्लाझ्मामध्ये हानिकारक प्रतिकारक पेशी (Immune Cells) असतात).
यानंतर, ह्या रक्तपेशी निरोगी व शरिरास अनुकूल अशा विशिष्ट द्रवासह (Replacement Fluid) पुन्हा शरीरात सोडल्या जातात.
ही प्रक्रिया करण्यासाठी एका विशेष उपकरणाची आवश्यकता असते.
इंट्राव्हेनस इम्यूनोग्लोब्युलिन थेरपीसाठी (IVIG Therapy), हजारो निरोगी दात्यांच्या समूहातून इम्यूनोग्लोब्युलिन्स विकसित केले जातात आणि ते GBS ने प्रभावित रुग्णाला शिरेतून (Vein) दिले जातात.
हे स्वतःच्या शरीरावर हल्ला करणाऱ्या प्रतिकारक पेशींची संख्या कमी करते आणि मज्जासंस्थेवरील प्रतिकारशक्तीच्या हल्ल्यांची तीव्रता कमी करते.
वैद्यकीय व्यवस्थापनासोबतच, GBS ने प्रभावित रुग्णासाठी सहाय्यक उपचार पद्धती देखील आवश्यक आहेत, जसे की:
इंटेन्सिव्ह केअर युनिट (ICU - अतिदक्षता विभाग) मध्ये मेकॅनिकल व्हेंटिलेटरी सपोर्ट अशा रुग्णांसाठी आवश्यक आहे, ज्यांच्या अशक्तपणामुळे किंवा पक्षाघातामुळे श्वासोच्छवासावर परिणाम झाला आहे.
ज्या रूग्ण्यांचे हृदयांचे ठोके किंवा रक्तदाब अनियमित आहे अशा रूग्णांना आरोग्य सेवा केंद्रांमध्ये वैद्यकिय उपकरणांद्वारे देखरेखीखाली ठेवण्याची आवश्यकता असू शकते.
जेव्हा ‘गी-यान-बाह-रे सिंड्रोम (GBS) ग्रस्त रुग्णांमध्ये उपचारामुळे सुधारणा दिसू लागते तेव्हा त्यांना शारिरीक शक्ती परत मिळवण्यासाठी आणि दैनंदिन जीवनपद्धती पुन्हा सुरू करण्यास पुनर्वसन सेवा आणि सहाय्य पुरवणे आवश्यक असते.
तथापि, श्वसनाचा त्रास (Respiratory Failure) यांसारख्या गंभीर समस्यांमधूनही जर बहुतांश GBS ग्रस्त रूग्णानी वेळेवर वैद्यकीय उपचार व व्यवस्थापन आणि चांगल्या प्रकारे दक्षता घेतली तर पूर्णपणे बरे होऊ शकतात.
कच्चे किंवा अपूर्णपणे शिजवलेले अन्न विशेषतः अंडी, मांस आणि शेलफिश (कवच असणारे समुद्री जीव) खाणे टाळा.
कच्चे किंवा पाश्चराईझ न केलेले दूध पिणे टाळा.
भारतीय डॉक्टरांच्या नुकत्याच दिलेल्या सल्ल्यानुसार बाहेरून आणलेले दुग्धजन्य पदार्थ (जसे की पनीर, चीज, पॅक केलेले दही, योगर्ट, लोणी (बटर), मेयोनीज इत्यादी) यांचे सेवन करणे टाळा. कारण, त्यामध्ये जास्त आर्द्रता असते आणि त्यामुळे जिवाणू वाढण्याची शक्यता अधिक असते.
शिजवलेला भात उघड्यावर (नेहमीच्या तापमानावर) न ठेवता त्वरित फ्रिजमध्ये ठेवा, कारण उघड्यावर ठेवल्याने तो बॅक्टेरियाच्या वाढीस अनुकूल ठरतो.
दूषित किंवा प्रक्रिया न केलेल्या (Unprocessed) पाण्याचे सेवन टाळा (फिल्टर केलेले / पिण्यास सुरक्षित असलेलेच पाणी प्या.) उकळलेले पाणी सेवन करण्याची सवय लावा.
कच्च्या भाज्या खाणे टाळा (नेहमी भाज्या स्वच्छ धुवून खा).
भांडी स्वच्छ ठेवा आणि प्रत्येक वापरापूर्वी नीट धुवा.
मांस चिरण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी इतर भांड्यांपासून वेगळी ठेवा आणि प्रत्येक वेळी ती भांडी वापरल्यानंतर नीट स्वच्छ करा.
हातांची स्वच्छता योग्य प्रकारे राखा (प्रसाधनगृह वापरल्यानंतर, प्राण्यांना हात लावल्यानंतर, त्यांचे अन्न, पाणी, मल, सामान किंवा घर यांना स्पर्श झाल्यास साबण आणि पाण्याने हात व्यवस्थित धुवा).
गर्दीच्या ठिकाणी जाताना आवश्यक तेथे फेस मास्क (Mask) चा वापर करा.
खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक हातरुमालाने झाका.
कोविड-१९ महामारी दरम्यान हातांची स्वच्छता योग्य प्रकारे कशी करावी याबाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा.
https://www.ninds.nih.gov/health-information/disorders/guillain-Barré-syndrome
https://www.cdc.gov/campylobacter/signs-symptoms/guillain-Barré-syndrome.html
https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/guillain-barré-syndrome
https://www.cdc.gov/campylobacter/about/index.html
https://www.cdc.gov/campylobacter/about/index.html
Guillain Barré Syndrome (GBS): Symptoms causes treatment prevention - Times of India