Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

झीरो ऑइल व्हेजिटेबल पेशावरी

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. पालक - १ जुडी २. फ्लॉवर (फुलकोबी) - १०० ग्रॅम ३. बेबी कॉर्न - ५ ४. ब्रोकोली - १०० ग्रॅम ५. गाजर - २ ६. कोबी - १०० ग्रॅम ७. कांदा - १ ८. टोमॅटो - १

मसाले : १. हळद पूड- १/२ टी स्पून २. संडे मसाला : १ टी स्पून ३. लाल काश्मिरी पूड - १/२ टी स्पून (रंग येण्याकरता) ४. चाट मसाला - १/२ टी स्पून ५. आमचूर पावडर - १/२ टी स्पून ६. हिरवे वाटण - १ टी स्पून ७. धने-जिरे- पूड - १/२ टी स्पून ८. मीठ - चवीप्रमाणे ९. कोथिंबीर - १ छोटी वाटी (सजावटी करता)

 

पध्दत :

१. सर्वप्रथम पालक स्वच्छ करून घ्या आणि हळद व मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. २. आता कोबी, गाजर आणि बेबी कॉर्न चिरून घ्या. ३. फ्लॉवर आणि ब्रोकोली चे बारीक तुकडे (पाकळ्या) करून घ्या. ४. चिरलेल्या सर्व भाज्या हळद आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. ५. सर्व भाज्या १५ मिनिटे झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ६. ह्यानंतर चिरलेल्या सर्व भाज्या, पालक, कांदा आणि टोमॅटो उकडून (वाफवून) घ्याव्यात. ७. वाफवल्यानंतर पालक वेगळा काढून थंड पाण्या मध्ये भिजवून ठेवावा जेणेकरून त्याचा हिरवा रंग नीट राहील. ८. पालकामधील जास्तीचे पाणी काढून टाका आणि मिक्सर मध्ये वाटून त्याची पातळ पेस्ट बनवून घ्या (पालक प्युरी). ९. आता उकडलेला कांदा आणि उकडलेला टोमॅटो मिक्सर मध्ये वाटून घ्या व त्याची पातळ पेस्ट बनवून घ्या. १०. आता एक भांडे हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह (आवडीनुसार/उपलब्धतेनुसार) ठेवा आणि त्यामध्ये टोमॅटो-कांदा पेस्ट घालून २-३ मिनिटांसाठी नीट परतून घ्या. ११. ह्यामध्ये २-३ मिनिटे झाल्यावर पालक पेस्ट (पालक प्युरी) मिक्स करा आणि साहित्यामध्ये दिलेले सर्व मसाले (संडे मसाला, चाट मसाला, लाल काश्मिरी पूड, धने जिरे-पूड, हळद पूड, आमचूर पावडर, हिरवे वाटण आणि मीठ) सुद्धा मिक्स करा व २-३ मिनिटांसाठी पुन्हा परतून घ्या. १२. आता ह्यामध्ये उकडलेल्या इतर सर्व भाज्या मिक्स करून मिश्रण ४-५ मिनिटांसाठी नीट ढवळून घ्या. १३. आवश्यकता वाटल्यास तुम्ही ह्यामध्ये भाज्या उकडल्यानंतर उरलेले पाणी सुद्धा मिक्स करू शकता. १४. आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी नीट ढवळून घ्या आणि ५-६ मिनिटांसाठी ह्यावर झाकण ठेवून द्या. १५. हि झाली तुमची झिरो ऑइल व्हेजिटेबल पेशावरी तयार. १६. हि तुम्ही भात/पोळी किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता. १७. ह्या स्वादिष्ट पाककृतीचा आस्वाद तुम्ही मोकळेपणाने घेऊ शकता.

 

Recipe in English