हरियाली सॅलड
साहित्य
• मुख्यसाहित्य:
१. पालक : १ जुडी
२. दही : १५० ग्रॅम किंवा (३/४ मोठा चमचा) - (ऐच्छिक)
३. मीठ : चवीनुसार
४. धणे-जीरे पावडर : १/२ छोटा चमचा
५. मिरची पावडर : १/४ छोटा चमचा
६. मिरचीचे फ्लेक्स : एक चिमूटभर (ऐच्छिक)
७. चाट मसाला : १/४ छोटा चमचा
• सजावटीसाठी:
१. मोहरी : १/२ छोटा चमचा
२. उडीद डाळ : १/२ छोटा चमचा
३. तीळ : १/२ छोटा चमचा
पध्दत :
१. पालक चिरून घ्यावा.
२. पुढील प्रकियेसाठी चिरलेला पालक सुमारे ५ ते ७ मिनिटे उकळत्या पाण्यात बुडवून शिजवून घ्यावा (ब्लान्च).
३. पालकातील पाणी गाळून घ्यावे.
४. हे पाणी आपण स्वयंपाक करतेवेळी भाजीचा स्टॉक म्हणून वापरू शकतो.
५. एका वाडग्यात दही फेटून घ्यावे.
६. दुसर्या वाडग्यात ब्लेन्चेड पालक, फेटलेले दही, मसाला (मिरची पावडर, डेक्सट्रोज, धाणे-जीरे पूड, चाट मसाला, मीठ) घालावे.
७. आता सजावटीसाठी : हॉट प्लेट / स्टोव्ह किंवा गॅसवर भांडे/फोडणी घालायचे कढलं गरम करावे व त्यात उडीद डाळ तपकिरी होईस्तोवर भाजून घ्यावी.
८. ह्यात मोहरी व तीळ घालावेत व १० सेकंद परतून घ्यावे.
९. आता हे सर्व मिश्रण पालकात घालावे.
१०. सर्वकाही व्यवस्थीत मिसळावे.
११. आता आपले हरियाली सॅलड /कोशिंबीर खाण्यास तयार झाली आहे.
१२. तुम्हाला आवडत असल्यास हे थंड करून घ्यावे.
१३. डाळ-भात किंवा पोळी बरोबर ह्याचा आस्वाद घ्यावा. किंवा नुसतीच ही थंडगार वाडगाभर कोशिंबीर खाऊन आपला दिवस उत्साही/ताजातवाना करावा.
[maxbutton id="3" url="https://images.healthonics.healthcare/hariyali-salad-english/" ]