•मुख्यसाहित्य: १. पालक- १ जुडी २. उकडलेला फ्लॉवर - १०० ग्रॅम ३. कांदा- १ मध्यम आकाराचा ४. लसूण- २ पाकळ्या ५. हिरवी मिरची - १ लहान ६. दूध- १०० मिली ७. मीठ- चवीप्रमाणे ८. ओरेगॅनो/धने-जिरे पूड- १/४ टी स्पून
पध्दत :
१. प्रथम साहित्यात दिलेल्या सर्व भाज्या त्यांच्या सालींसकट हळद आणि मीठ घातलेल्या कोमटपाण्या मध्ये १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवाव्यात, आणि १५-२० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.२. आता १ जुडी पालक नीट चिरून घ्यावा.३. कांदा, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरचीसुद्धा चिरून घ्यावी.४. नंतर एका कढई मध्ये थोडे पाणी घेऊन ती हॉटप्लेट/गॅस/स्टोव्ह वर गरम करत ठेवावी.५. आता ह्या कढई मध्ये चिरलेला पालक ५-७ मिनिटांसाठी उकडून घ्यावा.६. एक मिक्सरमध्ये चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि उकडलेला फ्लॉवर घ्यावा व त्यामध्ये थोडे मीठ आणि दूध मिक्स करावे.७. ह्या सर्व गोष्टी मिक्सर मध्ये एकजीव होईपर्यंत नीट वाटून घ्याव्यात.८. गरज वाटल्यास उरलेले दूध ह्यामध्ये मिक्स करावे (ऐच्छिक).९. हि फ्लॉवरची एकजीव पेस्ट म्हणजेच आपले क्रीम होय.१०. उकडलेला पालकसुद्धा मिक्सरमध्ये वाटून घ्यावा आणि त्याची एकजीव पेस्ट बनवून घ्यावी.११. आता एक तवा गरम करावा आणि त्यामध्ये पालकाची पेस्ट घेऊन नीट परतावी.१२ ह्यामध्ये फ्लॉवरची पेस्ट (आपले क्रिम) मिक्स करावी जेणेंकरू आपल्या सूप ला क्रिमी चव येईल.१३. क उकडल्यानंतर उरलेले पाणी ह्यामध्ये मिक्स करावे.१४. ओरेगॅनो/धने-जिरे पूड आणि चवीप्रमाणे मीठ मिक्स करून सर्व मिश्रण पुन्हा एकदा नीट ढवळावे.१५. तव्यावर झाकण ठेऊन हे ५-७ मिनिटांसाठी नीट उकळू द्यावे.१६. सूप एकदा नीट उकळले कि ते गरमागरम प्यायला घ्यावे.१७. हे सूप आपण जेवणापूर्वी घेऊ शकता.१८. तुमच्या कमी कॅलरीयुक्त गरमागरम क्रिम ऑफ पालक सूप (क्रिमविरहित) चा आस्वाद बिनधास्त लुटा!