•मुख्यसाहित्य: १. बोट वांगी (इटालियन एगप्लान्ट) / वांगी - २ २. हळद - १/४ छोटा चमचा ३. लाल तिखट - १/२ छोटा चमचा ४. धणे-जिरे पूड - १/४ छोटा चमचा ५. मीठ - चवीनुसार ६. तेल - थोडेसे (ब्रशने भांड्याला आतुन लावून घेण्यापुरते) ७. कोथिंबीर - सजावटीसाठी• फोडणीसाठी: १. मोहरी - १/४ छोटा चमचा२. तीळ - १/४ छोटा चमचा
पध्दत :
१. वांग्याचे (इटालियन एगप्लान्ट) छोटे तुकडे करुन ते पाण्यात बुडवून ठेवावेत.
२. उपलब्धतेनुसार हॉटप्लेट / गॅस / स्टोव्ह वर कढई गरम करुन घ्यावी व ब्रशने एक थेंब तेल नीट लावून घ्यावे.
३. गरम झालेल्या कढईत राई व तीळ घालावेत.
४. राई व तीळ तडतडू लागले की त्यात हळद घालावी व ५ सेकंद परतून घ्यावे.
५. त्यानंतर, ह्या कढईत वांग्याचे कापलेले तुकडे नीट परतून घ्यावेत.
६. आता त्यात लाल तिखट, धणे-जिरे पूड घालून पुन्हा २ मिनिटे नीट परतून घ्यावे.
७. मग चवीनुसार मीठ घालावे.
८. कढईवर झाकण ठेवून जवळजवळ ८-१० मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावे.
९. साधारण १० मिनिटे झाल्यावर पदार्थ नीट शिजला आहे का, हे पाहणे.