•मुख्यसाहित्य: १. घरी बनवलेला कमी कॅलरीजचा मेयोनेझ सारखा सॉस - २०० ग्रॅ २. गाजर - २ ३. कोबी - १०० ग्रॅ ४. मीठ - चवीनुसार ५. मिश्र हर्ब्स / धने-जिरे पावडर - १/२ चमचा (छोटा) ६. चिली (मिर्ची) फ्लेक्स / मिरची पावडर - १/४ चमचा (छोटा) ७. चाट मसाला – भुरभुरण्यासाठी
पध्दत :
१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५-२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५-२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.२. कोबी व गाजर किसून घ्या.३. एका वाड्ग्या मध्ये घरी बनवलेला कमी कॅलरीजचा थंडगार मेयोनेझसारखा सॉसकाढून घ्या.४. हा सॉस चांगला फेटून घ्यावा व त्यात किसलेला कोबी व गाजर घालावे.५. या सॉस मध्ये वर उल्लेखलेल्या सर्व साहित्याचा समावेश करावा (मिश्र हर्ब्स, धणे-जिरे पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स / मिरची पावडर) व मीठ ही घाला.६. या मिश्रणावर थोडासा चाट मसाला भुरभुरावा.७. हा पदार्थ थंडगारच सर्व्ह करावा :· एक वाडगाभर, जेवण एक भाग म्हणून किंवा· कोशिंबीर म्हणून किंवा· सॅन्डविच/ ओपन सबस / फ्रँकीज मध्ये सारण म्हणून वापरुन टिफिन्स मध्ये ही नेता येते किंवा· पोळी वा भाकरी बरोबरही खाता येते.
८. आता कोणत्याही अपराधी भावने शिवाय आपल्या आवडत्या लो कॅलरी भाज्यांचे कोलस्लोचा आनंद घ्या.