१. स्ट्रेनर (चाळणी सदृश्य भांडे) मध्ये १५० ग्रॅम तांदूळ ३ ते ४ वेळा धुवून घ्यावा.२. सर्व पाणी निथळून घ्यावे.३. हा धुवून घेतलेला तांदूळ, साध्या स्वच्छ कापडावर पसरावा.४. ह्यास ५ ते ६ तास पूर्णपणे वाळवून घ्यावे. (आवडीनुसार वा उपलब्धतेनुसार पंख्याखाली किंवा सूर्यप्रकाशामध्ये)५. पूर्णपणे वाळल्यावर, मिक्सरमध्ये त्याचे रवाळ पीठ होईपर्यंत भरडून घ्यावे.६. तांदळाचा हा रवा एका हवाबंद डब्यात साठवावा व फ्रिजमध्ये ठेवावा.७. योग्यरित्या साठवल्यास हा १ ते २ महिने टिकू शकतो.८. हा रवा- उपमा, सांजा, इडली, किंवा गोड शिरा बनवण्यासाठी वापरला जाऊ शकतो.९. ह्याला आपण नेहमीच्या रव्यासारखे वापरू शकतो.१०. हा आरोग्यदायक तर आहेच शिवाय त्यात कॅलरीज् ही कमी आहेत.