•मुख्यसाहित्य: १. लाल भोपळा - ३०० ग्रॅ २. मीठ - चवीनुसार ३. संडे मसाला - १/२ चमचा (छोटा) ४. धने-जिरे पावडर - १/२ चमचा (छोटा) ५. तांदूळ पीठ - १ चमचा (छोटा)
पध्दत :
१. प्रथम कोमट पाण्यात हळद व मीठ घालून सर्व भाज्या सालासकट, १५-२० मिनिटं भिजवून घ्याव्यात. त्यानंतर, १५-२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.२. आता लाल भोपळ्याचे पातळ चौकोनी काप करून घ्यावेत. ३. नंतर ही कापं ५ मिनिटं चांगली वाफवून घ्यावीत. मग मीठ, संडे मसाला, धने-जिरे पावडर व तांदळाचे पीठ ह्या मिश्रणामध्ये ही वाफवलेली कापं घोळवून घ्यावीत. ४. आता ही कापं एका नॉन-स्टिक पॅन मध्ये (हॉटप्लेट / स्टोव्ह / गॅस वापरुन), दोन्ही बाजूंनी कुरकुरीत सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावीत.५. ही कापं चविष्ट लागतात. ६. इव्हिंग स्नॅक्स (संध्याकाळचा अल्पोपहार) किंवा स्टार्टर (तोंडी लावण्यासाठीचा) म्हणून हा एक चांगला पर्याय असू शकतो.७. ह्यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असल्यामुळे, ह्या पदार्थाचा आस्वाद थोड्या जास्त प्रमाणातही घेता येऊ शकतो.